Thane Police : ठाण्यात १ कोटी ६९ लाख किंमतीचे एमडी ड्रग्स जप्त; मुंब्रा बायपास मार्गावर पोलिसांची कारवाई

Thane News : ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंब्रा बायपास जवळ सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार कारमधून संशयास्पदरित्या जाणाऱ्या मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा यास ताब्यात घेऊन गाडीची तपासणी
Thane News
Thane NewsSaam tv
Published On

ठाणे : मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरामध्ये मागील काही दिवसात एमडी ड्रग्स आढळून आले आहे. हे सर्व ड्रग्स जप्त करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली होती. यानंतर आता ठाणे शहरात देखील कारवाई करण्यात आली असून या कारवाईत तब्बल १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. 

ठाणे पोलिस आयुक्तालय परिक्षेत्रामध्ये अंमली पदार्थांच्या सेवांमध्ये तसेच विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तरुण पिढी या अंमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसत आहे. या अंमली पदार्थांच्या सेवन व विक्रीवर तसेच नशामुक्त तरुण पिढी करण्याच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सर्व विभागांना आदेश देत कारवाईचे निर्देश दिले होते. यामध्ये ठाणे गुन्हे शाखा घटक १ ला यश प्राप्त झालं आहे. 

Thane News
Wardha : पावसाळ्यात पिके वाचविण्यासाठी पिकांना द्यावे लागतेय पाणी; दोन आठवड्यापासून पावसाची उघडीप

गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत कारवाई 

ठाणे गुन्हे शाखेला गुप्त माहितीदारा मार्फत माहिती मिळाली होती की मुंब्रा बायपास मार्गावर एक इसम त्याच्या वाहनांमधून एमडी हा अंमली पदार्थ घेऊन जाणार आहे. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंब्रा बायपास जवळ सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार कारमधून संशयास्पदरित्या जाणाऱ्या मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा यास ताब्यात घेऊन गाडीची तपासणी करण्यात आली. 

Thane News
Pachora Crime : झोपेतच पत्नीचा गळा चिरला; चारित्र्याच्या संशयातून पतीचे भयानक कृत्य, नंतर केला आत्महत्येचा प्रयत्न

मुब्रा पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान पोलिसांनी तपासणी केली असता कारमध्ये १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपये किमतीचा १ किलो २०९ ग्रॅम एमडी या अंमली पदार्थांचा साठा आढळून आला. हा सर्व साठा हस्तगत करून त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून आरोपींनी हा अंमली पदार्थ कुठून आणला व कोणाला विक्री करणार होता याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com