Nagpur Breaking News:  Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Breaking News: नागपुरात घराला भीषण आग, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू

nagpur fire News in marathi : नागपुरातील गिट्टीखदान परिसरातील गोविंद गोरखडे संकुलासमोर एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. घराला लागलेल्या भीषण आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur Fire News:

नागपुरातून आगीची मोठी घटना समोर आली आहे. नागपुरातील गिट्टीखदान परिसरातील गोविंद गोरखडे संकुलासमोर एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. घराला लागलेल्या भीषण आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील गिट्टीखदान परिसरात एका घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आहे. मात्र, आगीत दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घराशेजारील लोकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. आगीची माहिती मिळताच दोन अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचले. घराला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहे.

आग कशी लागली?

घरातील भावंडांनी थंडीमुळे घरात शेकोटी पेटवली होती. या मुलांचे वडील कामावर गेले होते. तसेच या मुलांची आई बाजूच्या घरात गेली होती. घरात तीन भावंडं होती. त्याचवेळी घराला आग लागली. अचानक लागलेल्या आगीने घरात 7 वर्षांची मुलगी आणि 2 वर्षांचा मुलगा अडकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Free Tyres: ना पंक्चर, ना हवा भरण्याची गरज! बाजारात आले Air Free टायर, वैशिष्ट्ये काय?

Nagpur Crime : पोलिसाची तलावात उडी मारून आत्महत्या, नागपूर पोलिस दलात खळबळ; धक्कादायक कारण समोर

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भरधाव कारची ४ दुचाकींना धडक, २ जण जखमी

Viral Video: लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! स्टेजजवळ जात तरुणाने नवरीला गोळी झाडली, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Ro-Ro Service: मुंबई -कोकण रो-रो सेवा सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर, तिकीटाचे दर पाहून डोळे फिरतील | VIDEO

SCROLL FOR NEXT