Nagpur Crime News Saam Tv News
महाराष्ट्र

Nagpur Crime: शिक्षकाचा प्रताप, शौचालयात चोरून महिलांचे काढायचा व्हिडिओ; विकृताला पोलिसांकडून अटक

Crime in Nagpur School Teacher Arrested: शाळेतील स्वच्छतागृहात लपून महिलांचे व्हिडिओ काढल्या प्रकरणी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली आहे.

Bhagyashree Kamble

शाळेतील स्वच्छतागृहात लपून महिलांचे व्हिडिओ काढल्या प्रकरणी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शाळेत घडली आहे. कला शिक्षक म्हणून कार्यरत असणारा शिक्षक सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघ संकुलात एका कार्यक्रमाला गेला होता. महिला शौचालयात गेली असल्याचं पाहताच शिक्षकानं खिडकीतून चित्रीकरण केलं आहे. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नागपुरातील सीताबर्डीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षकानं चक्क शौचालयातील खिडकीतून महिलांचे व्हिडिओ काढले आहेत. हे धक्कादायक कृत्य समोर आल्यानंतर नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. मंगेश खापरे असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

दिघोरी येथील एका शाळेत कला शिक्षक म्हणून मंगेश कार्यरत आहे. सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघ संकुलातील एका कार्यक्रमात मंगेश गेला होता. त्यावेळी एक महिला शौचालयात गेली. शौचालयात गेल्यानंतर मंगेश त्या महिलेच्या मागोमाग गेला. महिला शौचालयात गेल्यानंतर मंगेशनं खिडतीतून तिचे चित्रीकरण केले.

महिलेला अचानक संशय आला. मंगेशला चित्रीकरण करत असताना महिलेने रंगेहाथ पकडलं. महिलेने आरडाओरडा केला. यावेळी तेथील काही नागरीकांनी आरोपी मंगेशला पकडले आणि फोन हिसकावून घेतला. मंगेशच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता, त्यात ८ -१० व्हिडिओ आढळून आले.

व्हिडिओ पाहताच नागरीकांचा संताप अनावर झाला. त्यांनी तातडीने थेट सीताबर्डी पोलिसांना याची माहिती दिली. सीताबर्डी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. याआधीही मंगेशने एका सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : अधिकार की लढाई में निमंत्रण नही भेजे जाते; छगन भुजबळांनी कुणावर साधला निशाणा? VIDEO

Mouni Roy Photos: अभिनेत्री मौनी रॉय साडीमध्ये दिसते खूपच हॉट, फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरेंच्या हस्ते दिपोत्सवाचं उद्घाटन

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचे शेरोशायरीतून अनुपस्थित काँग्रेस नेत्यांना टोला|VIDEO

Diwali 2025: फराळ नरम पडतोय? मग सोप्या टिप्स लगेचच करा फॉलो, महिनाभर टिकतील चकल्या अन् चिवडा

SCROLL FOR NEXT