Nagpur Accident  Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Accident : नागपुरात भीषण अपघात; भरधाव वाहनाच्या धडकेत बाप-लेकासहित तिघांचा मृत्यू, VIDEO

Nagpur Accident News : नागपुरात भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : नागपुरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपुरातील पांढुरणा मार्गावरील भागे महिरी शिवारात भीषण अपघाताची घटना घडली आहे. नागपूरच्या महिरी शिवारात सोमवारी १० वाजता झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. केळवद पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या पांढुरणा भागे येथील महिरी शिवारात सोमवारी १० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. केळवद पोलीस स्टेशनच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचा अपघात झाला. काटोलला जात असताना अज्ञात वाहनाने घडक दिल्यानंतर भीषण अपघात झाला. १० वर्षाचा मुलासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. तर जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनाचा केळवद पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

अपघातानंतर स्थानिक धावले मदतीला

महिरी शिवारात अपघात झाल्यानंतर घटनास्थळी खळबळ उडाली. अपघातानंतर स्थानिक मदतीला धावले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी रुग्णावाहिकेला बोलवून घेतले. त्यानंतर स्थानिकांनी तिघांना रुग्णवाहिकेत बसवून रुग्णालयात नेले. स्थानिकांनी तिघांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तिघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बाप-लेकासहित तिघांचा मृत्यू

नागपुरात झालेल्या भीषण अपघातात वडील, मुलगा आणि मेव्हण्याचा मृत्यू झाला आहे. ३८ वर्षीय शिवाजी परासराम शिरसाम, १० वर्षीय ललित शिवारी शिरसाम, २७ वर्षीय अनिल इवनाथ यांचा मृत्यू झाला आहे. अनिल इवनाथे हा शिवाजी शिरसामचा मेव्हणा आहे. ते आज केळवद शिवारात एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर पुन्हा कोटोलला जात असताना हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील तिघांचे मृतदेह प्राथमिक केंद्रात शवविच्छेदन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT