Nagpur Youth dies after drowning in lake  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News: मित्रांसोबत पार्टी करायला गेला, परत आलाच नाही; तरुणासोबत घडली भयानक घटना

Nagpur News Today: ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास हिंगणा तालुक्यातील बोरगाव परिसरात घडली.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News Today: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास हिंगणा तालुक्यातील बोरगाव परिसरात घडली.

पवन दिलीप गुंडावार असे मृत तरुणाचे नाव आहे. दिलीप हा एका खाजगी कंपनीत काम करीत होता. त्याच्या निधनाने गुंडावर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप हा मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी हिंगणा (Nagpur News) परिसरात आला होता.

पार्टीनंतर दिलीप आणि त्याचे मित्र बोरगाव तलावाजवळ फिरण्यासाठी गेले. तलावातील पाणी पाहून दिलीपला पोहण्याचा मोह आवरला नाही. तो मित्रांसोबत तलावाच्या पाण्यात उतरला. बराच वेळ होऊन तो पाण्याबाहेर न आल्याने त्याच्यासोबत असलेले मित्र घाबरले. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना (Police) दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तलावात पाणी जास्त असल्याने दिलीपचा काही थागपत्ता लागला नाही. शेवटी २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी दिलीपचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार! सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

शेख हसीना बांग्लादेशात परतणार? बांग्लादेशात पुन्हा हिंसाचार उफाळणार?

Health Tips : भात खाल्ल्यानंतर लगेच झोप येतेय? शरीरात नक्की काय घडतं, जाणून घ्या

Rohit Sharma Mumbai Indians Captain : मुंबईचा राजा! रोहित शर्मा पुन्हा MI चा कर्णधार, ५.४५ चं कोडं अखेर सुटलं; पाहा खास व्हिडीओ

Mumbai : मुंबईत धक्कादायक घटना! रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग; आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT