Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून तेल विक्री; नागपुरातील धक्कादायक प्रकार

Nagpur News : बाजारात तेलाचा अनेक कंपन्या आहेत. यातील काही प्रसिद्ध अशा कंपनीचे तेल नागरिक खरेदी करत असतात

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : तेलाच्या किंमती वाढल्याने याद्वारे फसवणूक करून पैसे कमविण्याचा प्रकार समोर आला आहे. तेलातील प्रसिद्ध अशा कंपनीचे बनावट स्टिकर डब्यांना लावून त्या नावाने लोकल तेलाची विक्री केल्याचे नागपूरमध्ये समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितास ताब्यात घेतले आहे. 

बाजारात तेलाचा अनेक कंपन्या आहेत. यातील काही प्रसिद्ध अशा कंपनीचे तेल नागरिक खरेदी करत असतात. अनेकदा तेलात बनावट करून विक्री केल्याचे देखील अनेकदा उघडकीस आले आहे. मात्र नागपूरमध्ये (Nagpur) प्रसिध्द असलेल्या फॉर्च्यून व किंग कंपनीच्या नावाचे बनावट स्टिकर लावून बाजारात तेलाची विक्री केली जात होती. इतवारी परिसरातील तेलीपुरा संकुलातील लक्ष्मी ऑइल स्टोअरमध्ये ब्रँडेड कंपनीच्या नावाने बनावट (Oil) तेल विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

दीड लाखाचा मुद्देमाल जप्त 

पोलिसांनी (Police) या माहितीच्या आधारे ऑइल स्टोअरमध्ये छापा टाकत तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीसह दुकानातील दोन कामगारांना अटक केली आहे. तसेच या कारवाईत पोलिसांनी एक लाख ५३ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PMचा PA बनायचंय? कशी होते पर्सनल सेक्रेटरीची निवड, किती असतो पगार?

Maharashtra Live News Update: बदलापुरात शिंदेसेनेचा कॉंग्रेसला दणका

राजकारणात घराणेशाहीचा डंका, कार्यकर्त्यांनी फक्त सतरांज्या उचलायच्या का? VIDEO

Shocking : मुंबई हादरली! पाणी भरण्यावरून वाद पेटला, मच्छर मारायचा स्प्रे तोंडावर मारून शेजाऱ्याची हत्या

Mumbai Fire : मुंबईतील कुर्ल्यात गॅस पाईपलाइन फुटून आग; चार दुकाने जळून खाक

SCROLL FOR NEXT