भोर (पुणे) : रानावनात चरायला सोडलेल्या शेळ्यांच्या खाण्यात विषारी झाडपाला आला असून त्यातून विषबाधा झाली. चरत असताना शेळ्या अचानक खाली पडल्या. यात आठ शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना पुण्याच्या भोर तालुक्यातील नाटंबी गावात घडली आहे. त्यामुळे शेतकरी विजय शिवाजी खोपडे (रा .नाटंबी) यांचे एक लाखाहून अधिक आर्थिक नुकसान झाले आहे.
नाटंबी (ता. भोर) येथील शेतकरी विजय खोपडे हे मागील बारा वर्षापासून शेळीपालन व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे ५५ शेळ्या आहेत. गुरुवारी दुपारी एक वाजता त्यांनी ५५ शेळ्या रानात चरायला सोडल्या होत्या. सर्व शेळ्या चरत असताना त्यातील आठ शेळ्या अचनाक जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडल्या. त्यानंतर काही वेळातच शेळ्यांचा मृत्यू झाला. शेळ्यांच्या खाण्यात विषारी झाडपाला आला असून त्यातून विषबाधा होऊन शेळ्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्याने (Farmer) व्यक्त केला आहे.
१ लाखाचे नुकसान
मृत्यू झालेल्या शेळ्यांमध्ये पंधरा हजार रुपये एका शेळीची किंमत असलेल्या राजस्थानी जातीच्या पाच शेळ्या आणि बारा हजार रुपये एका शेळीची किंमत असलेल्या इतर जातीच्या तीन शेळ्यांचा मृत्यू झाला असून शेतकर्याचे एक लाख अकरा हजारांचे नुकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.