Metro Fight: मेट्रोत हाय वोल्टेज ड्रामा; दोन महिलांचा जागेवरुन वाद, झिंज्या उपटल्या अन्.. VIDEO व्हायरल

Delhi Metro: दिल्ली मेट्रोच्या गर्दीच्या डब्यात बसण्याच्या जागेवरून दोन महिलांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
High Voltage Drama Inside Coach
Delhi Metro Women Fight Viral Videosaam tv
Published On

मुंबई असो दिल्ली लोक कामानिमित्त तासंतास प्रवास करत असतात. प्रत्येकाला पोट भरण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं. त्याच फक्त पुरुषच नाही तर महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. यामुळे ट्रेनमध्ये किंवा मेट्रोमध्ये प्रचंड गर्दी असते.

खूप धक्काबुक्की होते, कोनाचं सामान हरवतं, काणाला धक्का लागतो, कोणाला पाय लागतो आणि त्यावरुन होतात वाद. वाद झाले की, इतर प्रवासी त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर लगेचच अपलोड करुन जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचवतात. पुढे दिल्ली मेट्रोमधला महिलांचा असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांच्या गर्दीमुळे होणारे वाद काही नवीन नाहीत. मात्र नुकताच घडलेला एक प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. दिल्ली मेट्रोच्या एका डब्यात बसण्याच्या जागेवरून दोन महिलांमध्ये जोरदार वाद झाला आणि हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. व्हायरल व्हिडीओमध्ये मेट्रोच्या डब्यात प्रवासी खूप गर्दीत उभे होते. याच दरम्यान बसण्याच्या जागेवरून दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला.

High Voltage Drama Inside Coach
Gas Cylinder Expiry: तुमचा गॅस सिलेंडर एक्सापायर तर झाला नाही ना? आताच असं तपासा, अन्यथा...

सुरुवातीला फक्त शब्दांत होणारा वाद काही क्षणांतच आक्रमक झाला. दोन्ही महिला एकमेकींवर ओरडायला लागल्या, मग एकमेकींचे केस ओढायला लागल्या. यामध्ये असे दिसले की, पुरुष प्रवासी महिलांना सोडवण्याचा प्रयत्न करत होते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी गर्दी आणि तणावामुळे अशा घटना घडत असल्याचं सांगितलं आहे, तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी संयम बाळगण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. दिल्ली मेट्रो ही शिस्त आणि सुरक्षिततेसाठी ओळखली जाते, मात्र अशा घटनांमुळे लोक मेट्रोने प्रवास करणं कमी करतील असं दिसत आहे.

दिल्ली मेट्रो प्रशासनाकडून यापूर्वीही प्रवाशांना शिस्त पाळण्याचे आणि वाद टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज असल्यास सुरक्षारक्षक किंवा मेट्रो कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचाही सल्ला दिला जातो. मात्र तरीही गर्दीच्या वेळेत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे.

High Voltage Drama Inside Coach
Protein Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्रोटीन टाळा; या 5 गोष्टींकडे द्या लक्ष, 3 महिन्यात 10 किलो वजन होईल कमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com