Delhi Metro Viral Video: एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, सीटवर झोपवून धू धू धुतलं; मेट्रोमध्ये महिलांचा तुफान राडा

Delhi Metro Woman Fight Video: दिल्ली मेट्रोमध्ये दोन महिलांचा तुफान राडा झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एकमेकींचे केस ओढत आणि सीटवर झोपवून मारहाण करत असल्याचे दृश्य पाहून प्रवासी थक्क झाले.
Delhi Metro Viral Video
Delhi Metro Viral VideoSaam Tv
Published On

दिल्ली मेट्रोतील व्हिडीओ कायमच चर्चेत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही धक्कादायक असतात. मेट्रोमध्ये कधी कोणी भांडणं करतात तर काही कपलचे रोमॅन्टिक सीन्स समोर येतात. सध्याच महिलांच्या हाणामारीचा दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

Delhi Metro Viral Video
Viral Video: बाईई काय हा प्रकार! लॅपटॉपवर बनवल्या पुऱ्या, महिलेचा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल

शनिवारी सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील महिलांच्या दंगलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन महिला एकमेकांशी भांडताना दिसतायेत. दरम्यान एका प्रवाशाने हा व्हिडीओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या दोन्ही महिला प्रवासी एकमेकांचे केस ओढत मारामारी करत आहे. एक महिला सीटवर पडलेली दिसत आहे तर दुसरी महिला तिला मारताना दिसत आहे. मेट्रोमध्ये जास्त प्रवासी नसल्याचे दिसत आहे. तर इतर प्रवांशानी या दोघींना थांबवण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

सोशल मीडियावर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मेट्रोमधील महिलांची भांडणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. यापूर्वी देखील दिल्ली मेट्रोतील भांडणांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.

Delhi Metro Viral Video
Cricketer Death: दुचाकीवरून जाणाऱ्या क्रिकेटरचा दुर्दैवी मृत्यू, चालकाने कारचा दरवाज उघडला अन्...; अपघाताचा थरारक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com