नवरीला हळद लागल्यानंतर विपरीत घडलं, लग्नच रद्द झालं; कल्याणच्या हायप्रोफाइल सोसायटीत घडली धक्कादायक घटना

kalyan news : नवरीला हळद लागल्यानंतर लग्न रद्द झाल्यानंतर वधूसह पाहुण्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे.
Kalyan news
kalyan Saam tv
Published On
Summary

कल्याणमध्ये घडली धक्कादायक घटना

हळदी समारंभात जेवण केल्याने विषबाधा

वधूसह ४०-५० पाहुण्यांची तब्येत बिघडली

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याणमधील हायप्रोफाइल सोसायटी असलेल्या मोहन प्राइडमध्ये हळदी समारंभात जेवण केल्याने ५० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. हळदीच्या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याने लग्नच रद्द करण्यात आलं आहे. यामध्ये नवरीसह तिची आई आणि बहिणीलाही विषबाधा झाली आहे. या घटनेने वधूला मोठा मानसिक धक्का बसल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील मोहन प्राइड सोसायटीमध्ये हळदी समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आलेल्या ४० ते ५० पाहुण्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यामध्ये नवरीचाही समावेश आहे. तिलाही विषबाधा झाली. या घटनेमुळे लग्न रद्द करण्यात आलं. या प्रकरणी वधूच्या वडिलांनी संबंधित कॅटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalyan news
MIM चा भाजपला मोठा फटका; निवडणुकीत महापालिकेवरील सत्ता गेली? बॅकफूटवर जाण्याची कारणे काय?

पाहुण्यांसोबत नेमकं काय घडलं?

कल्याणमधील एका सोसायटीत लग्न होतं. काल हळदी समारंभाचा कार्यक्रम होता. या हळदीच्या कार्यक्रमात पाहुण्यांनी जेवण केलं. हळद समारंभ संपल्यानंतर पाहुणे रुमवर पोहोचले. समारंभातील जेवणामुळे या पाहुण्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले.

Kalyan news
मुंबई महापालिका निवडणूक होताच एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; निकालानंतर 29 नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम, कारण काय?

विषबाधा झालेल्या लोकांना तातडीने अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे वधूच्या कुटुंबाला लग्न सोहळा रद्द करावा लागला. वधूच्या वडिलांनी पोलिसांत कॅटर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी कॅटर्सला अटक करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com