Nagpur Deekshabhoomi: दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगविरोधात आंदोलन, १२५ जणांविरोधात गुन्हे
Deekshabhoomi Underground Parking Case Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Deekshabhoomi: दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगविरोधात आंदोलन, १२५ जणांविरोधात गुन्हे

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

नागपुरातील दीक्षाभूमी (Nagpur Deekshabhoomi) अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध करत आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी आंदोलन केले होते. आंदोलकांनी अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची तोडफोड केली होती. याप्रकरणी नागपूर पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी १२५ पेक्षा अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीशी संबंधित असलेल्या रवी शेंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरातील घटनेनंतर नागपूर पोलिसांकडून १२५ पेक्षा जास्त जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैर कायद्याची मंडळी जमवून आंदोलन, जाळपोळ केल्याप्रकरणी आणि ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलकांविरोधात हे गुन्हे नागपूरच्या बजाजनगर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये १५ आंदोलकांची ओळख पटलेली आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोपी आंदोलकांच्या नावाबाबत पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळली आहे. पुन्हा आंदोलनाचा भडका उडू नये यासाठी पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त दीक्षाभूमी परिसरात तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या शाळांना काल सुट्टी देण्यात आली होती. आजही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षाभूमी प्रकरणी रवी शेंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रवी शेंडे हे वंचित बहुजन आघाडी या पक्षाशी संबंधित आहे. ते वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्ष पदावर आहे. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या १५ लोकांची प्राथमिक ओळख पटली आहे. यासह अज्ञात मध्ये ११० च्या वर आंदोलकांचे नाव आहे. यात नागपूरबाहेरील जिल्ह्यातील सुद्धा काही जणांची नाव असून पोलिस त्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहे. पोलिस याबाबत कुठेही नाव पुढे करत नसून कमालीची गुपत्ता पाळत आहेत.

दरम्यान, नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील कुर्वेज मॅाडेल स्कूल या शाळेला आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरात सोमवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर आज शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरात काल ट्राफिक जामची मोठी समस्या निर्माण झाली होती. याशिवाय कायदा आणि सुव्यस्था निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त दीक्षाभूमी परिसरात तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कुर्वेज मॅाडेल स्कूल आज देखील बंद ठेवण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai VIDEO: मुंबईतील विमानसेवा पुर्वपदावर, इतर ठिकांनी वळवलेली विमानसेवा पुन्हा मुंबईत

Oil Free Recipes : सकाळी तेलकट नाश्ता नको; मग ही ऑईल फ्री रेसिपी नक्की ट्राय करा

Palghar Accident: रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी धाडकन आदळली; दीड वर्षाचा चिमुकला आईच्या हातातून निसटला, जागेवर झाला मृत्यू

Government Job: दहावी पास उमेदवारांना नगरपरिषदेत नोकरीची उत्तम संधी; अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या सविस्तर...

PM Kisan Yojana: 6 ऐवजी 8 हजार रुपये होणार पीएम किसान योजनेचा हप्ता, केंद्रीय अर्थसंकल्पात होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT