शिंदेसेनेच्या मंडलिकांना मोठा धक्का; दोन्ही राष्ट्रवादीनं राखला कागलचा गड, VIDEO

kagal local body election : कागल नगरपरिषदेमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगेंच्या युतीनं विजयाचा गुलाल उधळलाय...मात्र नगरपरिषदेच्या निवडणुकीत कागल का चर्चेत राहिलं? कट्टर विरोधक नेमके का एकत्र आले? कागलमध्ये कसा सामना रंगला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..
kagal news
kagal local body election Saam tv
Published On

लोकसभा असो वा विधानसभा...कोल्हापूरातील समरजितसिंह घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ हे दोघही एकमेकांचे कट्टर विरोधक .. मात्र नगरपरिषदेची निवडणुक लागली आणि तब्बल 11 वर्षांनी हे राजकीय वैरी एकत्र आले..या युतीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असतानाच हा युतीचा निर्णय निकालाअंती यशस्वी ठरलाय.. कागलमध्ये युतीच्या उमेदवार सविता माने यांची नगराध्यपदी वर्णी लागली... त्यामुळे नगरपरिषदेच्या निकालानंतर तर मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगेंचे सूर चांगलेच जुळून आलेत.

मुश्रीफ आणि घाटगेंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या कागल नगरपरिषदेत मतदानाला काही तास शिल्लक असतानाच ठाकरेसेनेच्या उमेदवार शारदा नागराळे यांनी शिंदेसेनेच्या युंगधरा घाटगेंना पाठिंबा दिला होता... त्यामुळे कागलच्या निकालाकडे अनेकाचं लक्ष होतं...

कागलमध्ये चुरशीची लढाई

कागलमध्ये एकसंध शिवसेना आणि एकसंध राष्ट्रवादी असा सामना रंगला... या चुरशीच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीचे 23 नगरसेवक विजयी झाले... तर कागलच्या नगराध्यक्ष पदी सविता मानेंचा विजय.झाला.

kagal news
शिवसेनेचा बुरुज ढासळला; अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेत कमळ फुललं

कागलच नव्हे तर मुरगुड नगरपरिषदेतही मुश्रीफ आणि घाटगेंची युती झाली होती... इथे शिंदेसेनं बाजी मारलीय. त्यामुळे शिंदेसेनेच्या संजय मंडलिकांना सोबत घेण्याचे संकेत देत समरजीत घाटगेंनी भविष्यातील राजकीय गणितं मांडली आहेत..

kagal news
अकोल्यात धक्कादायक निकाल; भाजपचे ५० नगरसेवक विजयी; काँग्रेस, वंचित अन् ठाकरेसेनेला किती जागा? पाहा आकडेवारी

कागल जिल्ह्याकडे नेहमीच कोल्हापूरचं राजकीय विद्यापीठ म्हणून पाहिलं जातं... त्यामुळे कागलमध्ये झालेली मुश्रीफ घाटगेंची युती जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीतही एकसंध राहते का? महायुतीचं पारडं जड असताना जिल्ह्यातील नव्या राजकीय गणितांच्या गुणाकारामुळे अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपलेली महापालिका निवडणूक अधिक चुरशीची होणार हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com