

राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आणि सगळ्यांचे लक्ष वळलं ते कोकणात. कोकणात सरपंचापासून खासदारापर्यंत प्रत्येक निवडणूक ही कायम रोमहर्षक असते. त्याला कारण आहे राणे कुटुंबिय. त्यातही यंदाची निवडणूक वैशिष्ट्येपूर्ण ठरण्याचं कारण म्हणजे मंत्री नितेश राणेंविरोधात आमदार निलेश राणेंनी ठोकलेला शड्डू.... याच प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार निलेश राणेंनी मंत्री नितेश राणेंना जोरदार धक्का दिला आणि शहर विकास आघाडीच्या संदेश पारकरांना निवडून आणलंय...
कणकवलीत भाजप विरुद्ध सगळे अशीच लढत झाली. या लढतीत कुणी किती जागांवर बाजी मारलीय... पाहूयात...
कणकवली निकाल
एकूण जागा 17
भाजप 9
शहरविकास आघाडी 8
नगराध्यक्ष - नगरविकास आघाडी
संदेश पारकर विजयी
भाजपला कणकवलीत 17 जागांपैकी 9 जागा राखण्यात यश आलं तर शहर विकास आघाडीला 8 जागा मिळाल्या असल्यातरी नगराध्यक्ष म्हणून शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर विजयी झाले.
नगर विकास आघाडी करत दोन्ही शिवसेना देखील भाजपच्या नितेश राणेंना रोखण्यासाठी मैदानात खांद्याला खांदा लावून लढल्या. या निवडणूकीत शिंदेगटाचे आमदार निलेश राणेंनी थेट भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकत पैसे वाटपाचा प्रकार उघड केला.आणि राणे बंधू आपापसातच भिडले...
आज या राणे भावाभावाच्या लढाईत राणेंचेचं कट्टर विरोधक आणि प्रतिस्पर्धी संदेश पारकर हे मोठ्या मताधिक्यानं कणकवलीचे नगराध्यक्ष झाले आहेत.... नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही राणे बंधूंमध्ये रंगलेला सत्तासंघर्ष आता निवडणुकीनंतर मिटणार की आणखी पेटणार येणाऱ्या काळात कळेलच पण सध्यातरी निलेश राणेनी आपणच मोठा भाऊ आहोत, हे सिद्ध केलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.