Police constable ends life by touching electric dp  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: धक्कादायक! पोलीस शिपायाने विद्युत डीपीला स्पर्श करत संपवलं जीवन; घटना सीसीटीव्हीत कैद

धक्कादायक! पोलीस शिपायाने विद्युत डीपीला स्पर्श करत संपवलं जीवन; घटना सीसीटीव्हीत कैद

साम टिव्ही ब्युरो

Nagpur Latest News: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका पोलीस शिपायाने विद्युत डीपीला स्पर्श करत आपलं जीवन संपवलं आहे. काशिनाथ कराडे असं मयत पोलीस शिपायाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे काशिनाथ कराडे हे रस्त्याच्या कडेने चालत विद्युत डीपीच्या कॅबिनकडे येतात. यानंतर ते विद्युत डीपीच्या कॅबिनचे दरवाजे उघडतात आणि मागे फिरतात. मागे येऊन ते कोणालातरी आपल्या फोनवरून मेसेज करताना दिसत आहेत.

फोनवर मेसेज केल्यानंतर ते पुन्हा विद्युत डीपी कॅबिनकडे जातात आणि त्याला स्पर्श करत जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र असं करत असताना ते खाली पडतात. यानंतर ते पुन्हा जाऊन विद्युत डीपीला स्पर्श करतात, यावेळी मात्र ते खाली पडतात, ते कायमचेच.  (Latest Political News)

काशिनाथ कराडे यांनी आपलं जीवन का संपवलं, हे अद्याप कळू शकलेलं नाही. या घटनेमुळे पोलीस दलाला देखील धक्का बसला आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. त्यांनी आपलं जीवन संपवण्याचं इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा काही दबाव होता का? ज्यामुळे ते तणावात होते, या संपूर्ण प्रकाराबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Mumbai E Water Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गेटवे ते जेएनपीए ‘ई वॉटर टॅक्सी’ २२ सप्टेंबरपासून धावणार

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबई लोकलला ‘वंदे मेट्रो’चा लूक, एसी लोकल होणार १८ डब्यांची; कसा आहे रेल्वेचा प्लान?

Navratri 2025: यंदा नवरात्र उत्सव कधीपासून आहे? तारीख अन् मुहूर्त जाणून घ्या

Gold Rate: सणासुदीत सोनं १ तोळ्यामागे २० हजारांनी वाढणार, वाचा तज्ज्ञांनी का वर्तवला अंदाज

SCROLL FOR NEXT