Vidharbha Weather Alert Saam Tv
महाराष्ट्र

Vidharbha Weather Alert: विदर्भ तापला! अंगातून घामाच्या धारा...घराबाहेर पडणं मुश्किल, हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा

Vidharbha Weather Update: हवामान खात्याकडून विदर्भाला उष्णतेच्या लाटेचाइशारा दिला आहे. सध्या पश्चिम विदर्भातील तापमान हे वाढत चालले आहेत. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

सध्या राज्यामध्ये ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. एकीकडे काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घालतंय. तर दुसरीकडे काही जिल्ह्यात कडाक्याचे ऊन आहे त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशामध्ये हवामान खात्याकडून (Weather Department) विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे. सध्या पश्चिम विदर्भातील तापमान हे वाढत चालले आहेत. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एम.एल.साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली असून याठिकाणी 44 अंश तर अमरावतीमध्ये 43.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवसांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंशापार जाऊ शकतो. तेच पूर्व विदर्भात मात्र अजूनही तुरळक पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात हळूहळू तापमान वाढेल. मे महिन्याचा शेवटच्या टप्प्यात तापमान वाढेल अशी शक्यता आहे.'

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट आहे. उन्हाची तीव्रता आणखी वाढत चालली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमान ४५ अंशापर्यंत पोहचले आहे. बीडमध्ये देखील पुढील चार दिवस तापमान ४३ अंशावर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे. २५ मेपर्यंत बीडमध्ये हिच परिस्थिती राहील.

तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. यवतमाळ, सांगली, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणीमध्ये मुसळधार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. अवकाळी पावसामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT