Akola News
Akola NewsSaam tv

Akola News : कापसाचे बियाणे घेताना महिलांमध्ये तुंबळ हाणामारी; अकोट येथील कृषी केंद्रावरील प्रकार

Akola News : सध्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरु आहे. पाऊस पडल्यानंतर कापूस लागवडीला सुरवात होणार असून बागायतदार शेतकरी मान्सूनपूर्व कापूस लागवड करत असतात

अक्षय गवळी 

अकोला : खरीप हंगामासाठी मान्सूनपूर्व बागायत कापसाची लागवड करण्याची सुरवात काही दिवसात होणार आहे. त्या अनुषंगाने बियाणे खरेदीला सुरवात झाली असून अकोटमध्ये कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर रांगेत असलेल्या शेतकरी महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. 

Akola News
Jalgaon crime : कुटुंब गाढ झोपेत; खिडक्यांच्या काचा फोडून लांबवले ६७ हजारांचे दागिने

सध्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) शेतकऱ्यांची तयारी सुरु आहे. पाऊस पडल्यानंतर कापूस लागवडीला सुरवात होणार असून बागायतदार शेतकरी मान्सूनपूर्व कापूस लागवड करत असतात. या हंगामातील बी-बियाणे विक्रीला सुरुवात झाली असून बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. कृषी केंद्रांवर बियाणे खरीदेसाठी (farmer) शेतकऱ्यांची गर्दी होताना दिसून येत आहे. प्रामुख्याने अकोल्यातल्या अनेक कृषी केंद्रावर अजित 155 कंपनीचे बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी रांगा लागल्या आहेत.

Akola News
Farmer Success Story : चवळी लागवडीतून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न; बिलोली येथील शेतकऱ्याचे योग्य नियोजन

तासभरापासून बियाणे खरेदीसाठी (Akola) शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र नंबर लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ २ पॅकेटच बियाण्याचे मिळते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. दरम्यान (Akot) अकोट नगरपालिकेसमोर असलेल्या कृषी केंद्रावर देखील बियाणे खरेदीसाठी रांगा लागल्या असून यात काही शेतकरी महिला देखील होत्या. रांगेत असलेल्या काही महिलांचा वाद झाला यातून त्यांच्यात हाणामारी झाली. महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ 'साम मराठी'च्या हाती लागला आहे.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com