Jalgaon crime : कुटुंब गाढ झोपेत; खिडक्यांच्या काचा फोडून लांबवले ६७ हजारांचे दागिने

Jalgaon News : १८ मेच्या मध्यरात्री अडीच वाजता घरातील सर्वजण झोपले होते. याच वेळी अज्ञात चोरट्यांने घराच्या गॅलरीतील खिडकी तोडून घरात प्रवेश केला
Jalgaon crime
Jalgaon crimeSaam tv

जळगाव : सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कुटुंब घरात झोपले असताना मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या खिडक्या तोडून चोरट्यानी आतमध्ये प्रवेश केला. यानंतर घरात ठेवलेले ६७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Jalgaon crime
Electric Shock : थंड पाणी भरताना वॉटर कुलरमधून विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

जळगाव (Jalgaon) शहरातील उस्मानिया पार्क परिसरात हि घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अब्दुल करीम अब्दुल रेहमान (वय ३१) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पेंटींगचे कामे करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान १८ मेच्या मध्यरात्री अडीच वाजता घरातील सर्वजण झोपले होते. याच वेळी अज्ञात चोरट्यांने घराच्या गॅलरीतील खिडकी तोडून घरात प्रवेश केला. कोणाला काहीही न समजू देता घरातून ६७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने (theft) चोरून नेले.

Jalgaon crime
Sambhajinagar News : नांदूर मधमेश्वर पाणी प्रश्न पुन्हा पेटला; शेतकऱ्यांची पाटबंधारे कार्यालयावर धडक

घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरूणाने पोलीस (Police) स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली. जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपस सुरु केला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com