Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv

Sambhajinagar News : नांदूर मधमेश्वर पाणी प्रश्न पुन्हा पेटला; शेतकऱ्यांची पाटबंधारे कार्यालयावर धडक

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये देखील पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने जिल्ह्यातील गंगापूर व वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यातील नांदूर- मधमेश्वर कालव्यातून पाणी उपलब्ध होऊ शकते
Published on

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : पाणी प्रश्न निर्माण झाल्याने नाशिक धरणातून नांदूर- मधमेश्वर कालव्यात पाणी सोडण्यात यावे; अशी मागणी शेतकऱ्यांकडून यापूर्वीही करण्यात आली होती. दरम्यान या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकरी प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Sambhajinagar News
Nandurbar Crime : रस्त्यावर अडवून लूटमार; व्यापाऱ्याजवळची ४५ हजारांची रोकड घेऊन झाले फरार

यंदाच्या उन्हाळ्यात पाणी प्रश्न सगळीकडेच गंभीर बनला आहे. (sambhajinagar) संभाजीनगरमध्ये देखील पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने जिल्ह्यातील गंगापूर व वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदूर- मधमेश्वर कालव्यातून पाणी उपलब्ध होऊ शकते. त्या अनुषंगाने नांदूर- मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठीच शेतकऱ्यांचे गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे.  

Sambhajinagar News
Electric Shock : थंड पाणी भरताना वॉटर कुलरमधून विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

तीव्र आंदोलनाचा दिला इशारा 

यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. हक्काचे ११ टीएमसी पाणी मिळावे, यासाठी शेतकरी (Farmer) आक्रमक झाले असुन आतापर्यंत फक्त तीन टीएमसी पाणी मिळाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान आमचा पाणी प्रश्न मार्गी लागला नाही; तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com