Electric Shock : थंड पाणी भरताना वॉटर कुलरमधून विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : पाच ते सहा वर्षांपूर्वी त्याचे आई, वडील, भाऊ येथे उदरनिर्वाहासाठी आले होते. वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता
Electric Shock
Electric ShockSaam tv

रावेर (जळगाव) : सध्या जळगाव जिल्ह्यातील तापमान ४३ अंशाच्या वर पोहचले असल्याने अगदी सकाळपासून उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. यामुळे थोडा दिलासा म्हणून कुलरचा वापर केला जात आहे. शिवाय थंड पाणीचा आधार घेतला जात आहे. दरम्यान दुपारी पिण्यासाठी थंड पाणी घेत असताना वॉटर कुलरला हात लावताच विजेचा जोरदार झटका बसला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना १९ मी रोजी दुपारी घडली. 

Electric Shock
Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा कहर; फळ पिकांसह उन्हाळी पिकांचं मोठे नुकसान

धृपकुमार चरनसिंग कुशवाह (वय २६) असे मृत तरुणाचे नाव असून तो  मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सुजालपुरा (ता. लहार, जि. भिंड) येथील मूळ रहिवाशी असून रावेरमधील श्रीकृष्णनगरात वास्तव्यास होता. बऱ्हाणपूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ पाणीपुरीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारी दुपारी चारच्या सुमारास धृपकुमार व्यवसायासाठी पेट्रोल पंपावरील वॉटर कुलरचे थंड पाणी आणण्यासाठी गेला होता. वॉटर कुलर सुरू करताना त्याला शॉक (Electric Shock) लागून तो खाली कोसळला. 

Electric Shock
Nandurbar Crime : रस्त्यावर अडवून लूटमार; व्यापाऱ्याजवळची ४५ हजारांची रोकड घेऊन झाले फरार

वर्षभरापूर्वीच झाला होता विवाह 

यानंतर त्याचा भाऊ शिवम याच्यासह काही नागरिकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. पाच ते सहा वर्षांपूर्वी त्याचे आई, वडील, भाऊ येथे उदरनिर्वाहासाठी आले होते. वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता. याबाबत भाऊ शिवम कुशवाह याने दिलेल्या माहितीवरून (Raver) रावेर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक इस्माईल शेख तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com