Nagpur Medical Collage Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Medical Collage : लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात शिरले घाण पाणी; नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील प्रकार

Nagpur News : लहान मुलांच्या अतिदक्षता विभागासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी घटना घडल्याने बांधकाम विभागाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात असलेल्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात बाथरूमचे घाण पाणी शिरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या वार्डात २६ बालक उपचारासाठी दाखल असताना हा प्रकार घडल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले असून हे पाणी काढण्याचे काम सुरु करण्यात आले होते.  

नागपूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. तर या रुग्णालयात लहान मुलांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वार्ड असून या वॉर्डमध्ये २६ चिमुकले उपचारासाठी दाखल होते. असे असताना अतिदक्षता विभागात घाण पाणी शिरले. अगोदरच लहान मुलांवर उपचार सुरु असताना त्यांच्या आरोग्याची दक्षता पूर्णपणे घेतली जात असून या प्रकारामुळे चिमुकल्याचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. 

नूतनीकरणाचे काम संथ गतीने 

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मेडिकलमधील काही वॉर्डचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे. साधारण मागील नऊ महिन्यापेक्षा अधिकचा काळ उलटून देखील काम पूर्ण होऊ शकलेले नाही. नूतनीकरणाचे हे काम अगदी संथ गतीने सुरू असून चुकीच्या कामाचा फटका रुग्णांना बसत आहे. यातच लहान मुलांच्या वॉर्डात घाण पाणी शिरल्याने आरोग्य प्रशासनाचा कारभार समोर आला आहे. या निष्काळजीपणाला कोण जवाबदार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

गटार तुंबल्याने पाणी वॉर्डात 
लहान मुलांचे अतिदक्षता विभाग वॉर्ड क्र.२५ आणि २६ चे नूतनीकरण सुरू असताना बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बांधकामाचा कचरा दुसऱ्या मजल्यावरून खाली टाकायला सुरुवात केली. त्यामुळे गटार तुंबली आहे. परिणामी वॉर्ड २५ मधील बाथरूमचे घाणेरडे पाणी तुंबून संपूर्ण वॉर्डमध्ये पसरले. पाहता पाहता दुर्गंधी सुटली आणि वॉर्डमध्ये पाणी साचले गेले. या घटनेनंतर सफाई कर्मचाऱ्यांनी पाणी काढले, जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Juice For Long Black Hair: काळे आणि लांब केस हवे आहेत? रोज प्या आवळ्याचा रस

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 12 दिवसांचा मेगा ब्लॉक, वाचा संपूर्ण वेळापत्रक

OnePlus 15 Smartphone: जबरदस्त फीचर्स अन् कॅमेरासह One Plus 15 लाँच; किंमत किती?

Kisan Vikas Patra: पैसे डबल करणारी योजना! ११५ महिन्यात ५ लाखांचे होणार १० लाख; जाणून घ्या

ऐन निवडणुकीत अजित दादांच्या गटात धुसफूस, आमदाराची 'मुंडेंना पाठवू नकाच', अशी मागणी; कारण काय?

SCROLL FOR NEXT