Maval : शेतकऱ्यावर रिंग रोड आणि टीपी योजनेचे संकट; मावळमधील शेतकरी आक्रमक, शेतीची जागा देण्यास नकार

Maval News : शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व आठही गावांना भेटी देत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी साम टीव्हीशी बोलताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले
Maval News
Maval NewsSaam tv
Published On

मावळ : मावळच्या दारूंबरे, गोडुंबरे, साळुंबरे, धामणे, नेरे, उर्से या गावातील शेतकऱ्यावर टीपी स्कीम आणि रिंग रोडची टांगती तलवार आहे. पिढ्यानपिढ्याची आणि आमच्या वडिलोपार्जित जपलेली ही शेती आहे. रिंग रोड आणि टीपी या योजनेत शासन हि जमीन घेऊन आमच्यावर अन्याय करीत आहे. असा हल्लाबोल ग्रामस्थांनी सरकारवर केला. 

मावळ परिसरातील अनेक गावांमधून रिंग रोड नेला जात आहे. तसेच याच परिसरात टीपी स्कीम देखील नियोजित आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. दरम्यान रिंग रोड व टीपी योजनेमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानाकडे लक्ष वेधून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. ही जमीन जर स्कीमसाठी घेतली, तर आमच्या पुढच्या पिढीचे काय? असा सवाल शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे. 

Maval News
Accident News : नाईट ड्युटी करून घरी परतताना काळाची झडप; स्कूल व्हॅनच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, संतप्त जमावाने फोडले वाहन

भावना व्यक्त करताना अश्रू अनावर 

आमची बागायत शेती आहे. या शेतीत ऊस, भात, सोयाबीन, फुलशेती यासारखे अनेक पीक घेतले जातात. मात्र जमिनीच राहिली नाही तर आम्ही करायचं काय? आमचा अंत बघू नका असे म्हणत शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने या सर्व आठही गावांना भेटी दिल्या आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी साम टीव्हीसी बोलताना शेतकरी अक्षरशः धयमूक रडत होते. 

Maval News
Ashram School : वर्षभरापासून पोल्ट्री फार्ममध्ये भरतेय आश्रम शाळा; १२ कोटीची सुसज्ज शाळेची इमारत पडून

काली फीत बांधून सरकारचा निषेध 

सरकार आमचं ऐकून घेत नाही, आता तुम्ही तरी आम्हाला न्याय द्या; अशी आर्त हाक शेतकरी साम टीव्हीसी बोलताना बोलत होते. दरम्यान हाताला काळी फित बांधून गावकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. जर सरकार आमचं म्हणणं ऐकत नसेल तर आम्ही लोकशाही मार्गाने न्यायालयात जाऊ असेही शेतकरी म्हणाले. मात्र ग्रामस्थांचा हा संघर्ष पुढे कोणते वळण घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com