Nagpur School Timetable News Saam Tv
महाराष्ट्र

School Holiday: नागपुरातील शाळा-कॉलेजला शनिवारी सुट्टी जाहीर, नेमकं कारण काय?

Nagpur School Timetable News: नागपुरमधील शाळा आणि महाविद्यालयांना १७ एप्रिल रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विदर्भात हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Priya More

Summary -

  • नागपुरात १८ एप्रिल रोजी शाळांना सुट्टी जाहीर

  • यलो अलर्ट आणि वाढत्या उष्णतेमुळे प्रशासनाकडून निर्णय

  • विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत घेण्यात आला निर्ण

  • अकोल्यात शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला

राज्यात सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला असून उकाडा वाढला आहे. उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत असल्यामुळे नागरिक प्रचंड वैतागले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आणि दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन केले जात आहे. काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून शाळांच्या वेळात बदल करण्यात आले आहेत. अशामध्ये आता नागपुरमधील शाळांना १८ एप्रिल म्हणजे शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाढल्या उष्णतेमुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या उष्णतेच्या यलो अलर्टमुळे शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नागपूर जिल्हा सीमा क्षेत्रातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळं शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहे. आता अकोल्यात सकाळी ११ वाजेपर्यंतच शाळा सुरू राहणार आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी याबाबत आदेश दिले आहोत. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची गंभीर दखल घेत शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये तातडीने बदल करण्याची सूचना बजावल्या आहेत. सर्व शाळा सकाळी ११ वाजेपर्यंत भरविण्यात याव्या. त्यानंतर शाळा सुरू ठेवल्यास संबंधित शाळेवर प्रशासकीय तथा दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे.

दरम्यान, राज्यातील शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. विदर्भासह राज्यातील शाळा यावर्षी १५ जूनपासून सुरु होणार आहे. दरवर्षी विदर्भातील तीव्र उन्हामुळे त्या भागातील शाळा १० ते १५ दिवस उशिरा सुरू होतात. राज्यातील सर्व शाळा पुढील शैक्षणिक वर्षापासून १५ जूनला सुरू करण्याचा बदल करण्यात आलेला आहे. उन्हाळी सुट्टी विद्यार्थ्यांना २ मे पासून जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT