AI Anganwadi Saam tv
महाराष्ट्र

Anganwadi : नागपुरात पहिली AI आधारित अंगणवाडी; व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी सेट्सच्या माध्यमातून शिक्षण

Nagpur news : आता अंगणवाड्याही स्मार्ट होत असून नवीन तंत्रज्ञानाशी सजलेली अंगणवाडी नागपूर जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. बाल भरारी मिशन अंतर्गत अंगणवाडी कात टाकत आहे. आगामी काळात हि संख्या आणखी वाढणार आहे

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वडधामना गाव देशातील एक नवा आदर्श निर्माण करत आहे. कारण, या गावात देशातील पहिली "AI आधारित अंगणवाडी" सुरु करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या संकल्पनेतून गरीब मुलांनाही चांगल शिक्षण मिळावं यासाठी उपक्रम राबवला जात असून बाल भरारी मिशन अंतर्गत अंगणवाडी कात टाकत आहे. 

आजच्या डिजिटल युगात शिक्षणाचे स्वरूप देखील झपाट्याने बदलत आहे. आता तो बदल अंगणवाड्यांपर्यंत पोहोचला आहे. यात नागपूर जिल्ह्यातील वडधामना इथल्या अंगणवाडीत ३ ते ६ वयोगटातील लहान मुलांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी सेट्सच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात आहे. VR सेट वापरून मुलांना खेळत- खेळत, प्रत्यक्ष अनुभवा सारखं शिक्षण मिळत आहे. सध्या २५ मुलं या तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत.

पोषणात्मक डेटाही डिजिटल स्वरूपात 
अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी सेट्सच्या माध्यमातून शिक्षण देण्यासोबत अंगणवाडीत गर्भवती महिलांचा वैद्यकीय व पौषणात्मक डेटा देखील डिजिटल स्वरूपात संकलित केला जातो. यामुळे आईपासून लेकरापर्यंतच्या आरोग्य आणि विकासावर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे. अर्थात वडधामना येथील हि अंगणवाडी एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे. 

 जिल्ह्यातील ४० अंगणवाड्या AI होणार 

पुढच्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यात एकूण ४० AI अंगणवाड्या सुरु होणार आहेत. ग्रामीण भागातीलही मुलांना आधुनिक शिक्षण आणि डिजिटल साधनांची संधी मिळावी. या AI अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांचं सर्वांगीण विकास मॉनिटर करता येणार आहे आणि त्यांना तंत्रज्ञानाशी लवकर जोडता येणार आहे. हे मॉडेल संपूर्ण देशासाठी एक प्रेरणा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नाशिकमध्ये मविआला खिंडार! अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ, भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला यश

MPSC विद्यार्थिनीला लग्नाचं खोटं वचन; उद्योगपतीकडून वारंवार शारीरिक संबंध, बारामतीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: खोट्या मतदार यादीविरोधात शिवसेना ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

सलमान खानच्या 'Bigg Boss 19'मध्ये दिसणार 'नागिन'ची पहिली झलक, 'ही' अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

Dharashiv News : बांधकाम व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, टोळीकडून लोखंडी रॉडने मारहाण; धाराशिवमध्ये खळबळ, CCTV व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT