wardha : कौटुंबिक कलह विकोपाला; शाळेच्या आवारातील क्वाटरमध्ये शिक्षकाने संपविले जीवन

Wardha news : काही दिवसांपूर्वी पत्नीशी वाद झाल्याने शिक्षक शाळेतील क्वाटरमध्येच राहत होते. यात त्यांनी आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले असून शिक्षकाचे नातेवाईक आल्यावर मृतदेचे शवविच्छेदन होणार
Wardha news
Wardha newsSaam tv
Published On

चेतन व्यास 

वर्धा : वर्धेच्या सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयाच्या शिक्षकाने शाळेच्या आवारात असलेल्या क्वाटरमध्येच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कौटुंबिक कलहामुळे आलेल्या तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

वर्धा जिल्ह्यातील सेलुकोट येथे असलेल्या नवोदय विद्यालयात आज सकाळी सदरची घटना उघडकीस आली आहे. यात संजय पंडित देवडे (वय ५३) असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. संजय देवडे हे शाळेच्या परिसरात असलेल्या क्वाटर मध्ये वास्तव्यास होते. दरम्यान काल रात्रीपासुन क्वाटरचे दार बंद असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी दार थोटावले. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दार उघडून पाहिल्यावर शिक्षकाने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. 

Wardha news
Nanded : डांबरीकरण झालेल्या रस्त्याची पोलखोल; नांदेड जिल्ह्यात पुन्हा एक बोगस काम आले समोर

पत्नीसोबत झाला होता वाद 
दरम्यान पारिवारिक कलहातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर संजय देवडे यांचा काही दिवसांपूर्वी पत्नी सोबत वाद झालं असल्याची चर्चा असून यानंतर ते शाळेच्या क्वाटरमध्ये एकटेच राहत होते. यात मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची माहिती असून शिक्षकाजवळ आत्महत्येपूर्वी एक लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली आहे. यात देखील परिवारिक कलहातून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. 

Wardha news
DHFL Scam : DHFL आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोठी घडामोड; अविनाश भोसलेंना दिलासा, मालमत्ता मुक्त करण्याचा ईडीचा प्रस्ताव

पोलिसांकडून तपास सुरु 

सकाळी घटना उघडकीस आल्यावर खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी भेट देत मृतदेह ताब्यात घेऊन सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करिता सामान्य रुग्णालयात पाठवले आहे. मृतकाने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहली असून त्यात मानसिक तणावाचा उल्लेख आहे. प्रकरणाचा तपास केला जातं असून नेमक कारण काय याचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com