DHFL Scam : DHFL आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोठी घडामोड; अविनाश भोसलेंना दिलासा, मालमत्ता मुक्त करण्याचा ईडीचा प्रस्ताव

Pune News : पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. DHFL आर्थिक फसवणूक प्रकरणाशी संबंधित मालमत्ता मुक्त करण्याचा प्रस्ताव संबंधित शासकीय विभागाकडे सादर
DHFL Scam
DHFL ScamSaam tv
Published On

पुणे : डीएचएफएल आर्थिक घोटाळ्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांच्या विरोधात ईडीने मोठी कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान त्यांची पुण्यातील प्रॉपर्टी देखील जप्त करण्यात आली आहे. आता मात्र या प्रकरणात मोठा टर्निंग पॉईंट आला असून भोसले यांची जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्याचा प्रस्ताव ईडीने सादर केला आहे. 

पुण्यातील नामांकित उद्योगपती असलेले अविनाश भोसले यांच्या विरोधात ईडीने डीएचएफएल आर्थिक घोटाळ्या प्रकरणी मोठी कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान अविनाश भोसले यांच्या प्लॉट नं. 2 यशवंत घाडगे नगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, गणेशखिंड रोड, पुणे यासह काही महागड्या प्रॉपर्टी व बँक व्यवहार ईडीच्या रडारवर होते. कारवाईत काही प्रॉपर्टी देखील जप्त करण्यात आल्या होत्या. 

DHFL Scam
Raisin Price : चिनी बेदाण्याने मार्केट खाल्ले; महिन्याभरापासून बेदाणा दरात घसरण, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

मालमत्ता रिलीज करण्याबाबत ईडीकडून पत्र 

दरम्यान विशेष PMLA कोर्टानं या प्रकरणात डिसेंबर २०२२ आणि एप्रिल २०२३ मध्ये अविनाश भोसले आणि इतरांना डिस्चार्ज दिला होता. यात मूळ गुन्हाचे म्हणजे scheduled offence अभावी बंद झाला. त्यामुळे ईडीने कारवाईत जप्त केलेली मालमत्ता जप्ती वैध राहू शकली नाही. यानंतर १२ जून २०२५ रोजी ईडीने नोंदणी विभागाच्या पुणे कार्यालयाला पत्र लिहून मालमत्ता रिलीज करण्याची विनंती केली आहे.

DHFL Scam
Nanded : डांबरीकरण झालेल्या रस्त्याची पोलखोल; नांदेड जिल्ह्यात पुन्हा एक बोगस काम आले समोर

भोसलेंना दिलासा 

मोठ्या कारवाईनंतर आता कोर्टाच्या निर्णयामुळे अविनाश भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जप्त केलेली प्रॉपर्टी लवकरच भोसले यांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. तर या प्रकरणात ED किंवा कोर्टाकडून काय पुढील पावलं उचलली जातात याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान अविनाश भोसले यांचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची चर्चा यापूर्वी देखील रंगली आहे. यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com