Nanded : डांबरीकरण झालेल्या रस्त्याची पोलखोल; नांदेड जिल्ह्यात पुन्हा एक बोगस काम आले समोर

Nanded News : डांबरी रस्ता बनविताना यात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. नांदेड जिल्ह्यात अशाच प्रकारे महिनाभरापूर्वी झालेल्या रस्त्याचे डांबर हाताने उखडून निघत आहे
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 

नांदेड : ग्रामसडक योजनेंतर्गत महिनाभरापूर्वी झालेल्या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. चक्क हाताने डांबरीकरण केलेला हा रस्ता उखडून निघत असल्याने रस्त्याच्या कामाचा दर्जा उघड झाला आहे. अर्थात तरुणाने रस्त्याचे निकृष्ट झालेल्या कामाची पोलखोल केली असून नांदेड जिल्ह्यातील बोगस काम उजेडात आले आहे. 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बेटकबिलोली येथील हा प्रकार आहे. तर बोगस डांबरीकरण रस्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्माण होत असलेले डांबरीकरण रस्ते आता भ्रष्टाचाराचे कुरण बनत असल्याचा प्रकार समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यात यापूर्वी देखील असाच प्रकार समोर आला होता. यानंतर पुन्हा एकदा बोगस रस्त्याचे काम समोर आले आहे. 

Nanded News
Ganesh Utsav 2025 : गणेशोत्सवात लेसर बंदी; उल्लंघन करणाऱ्यावर होणार फौजदारी कारवाई

महिनाभरापूर्वीच झाला होता रस्ता 

दरम्यान नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बेटकबिलोली त्या गावाला जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे काम बोगस झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका महिन्यापूर्वीच केलेला डांबरीकरण रस्ता तरुणाने चक्क हाताने उकडून दाखवला आहे. त्यामुळे या कामाचा दर्जा उघड झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नायगाव ते बेटक बिलोली पर्यंत हा डांबरीकरण रस्ता तयार करण्यात आला. या डांबरीकरण रस्त्यासाठी ६ कोटी ६६ लक्ष निधी खर्च करण्यात आला. 

Nanded News
Raisin Price : चिनी बेदाण्याने मार्केट खाल्ले; महिन्याभरापासून बेदाणा दरात घसरण, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

गुन्हा दाखल करण्याची तरुणाची मागणी 

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्या मतदारसंघातील हा प्रकार आहे. डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरील डांबर अगदी सहजपणे हाताने उखळून निघत आहे. यामुळे बोगस डांबरीकरण रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या तरुणाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com