Dada Bhuse : शिवसेना पक्षातील संख्या वाढीच्या सेटिंगकडे लक्ष द्यावं; दादा भुसे यांचा संजय राऊतांना टोला

Bhandara News : शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी एसआयटी कोण कोण आहे याची लवकरच माहिती मिळेल. चौकशीत दोषी आढळल्यास, कोणाला सोडणार नाही. दादा भुसे यांनी शिक्षक भरती घोटाळ्यावर माहिती
Dada Bhuse
Dada BhuseSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: दररोज सकाळी साडेनऊ वाजता एक भोंगा खाद्य देतो. ते कोणाबद्दल काय काय बोलत असतात. मात्र एकेकाळी शिवसेनेची संख्या ६०-७० च्या घरात होती. ती हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने असायची. ती आता वीसवर आलेली आहे. यामुळे या सेटिंग कडे आता लक्ष द्यावं कि संख्या कशी वाढेल; अशा शब्दात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत याना लगावला आहे. 

मंत्री दादा भुसे हे भंडारा येथे आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आता उद्धव ठाकरे हे दिल्लीला स्नेहभोजनासाठी जात आहेत. मग राहुल गांधींसोबत ती पण सेटिंग बोलायचं का? असा प्रति प्रश्न शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतानी एकनाथ शिंदेंना लगावलेल्या टोल्यावर व्यक्त केला आहे. 

Dada Bhuse
DHFL Scam : DHFL आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोठी घडामोड; अविनाश भोसलेंना दिलासा, मालमत्ता मुक्त करण्याचा ईडीचा प्रस्ताव

शिवसेनेचा एकच बाप 

यासोबतच भाजप आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केलेल्या मीच शिवसेनेचा बाप. अशा वादग्रस्त विधानावरही दादा भुसे यांनी खरपूस समाचार घेताना जोपर्यंत शिवसेना आहे. तोपर्यंत शिवसेनेचा एकच बाप आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचा बाप आहेत; असा टोला परिणय फुके यांना दादा भुसे यांनी लगावला.

Dada Bhuse
wardha : कौटुंबिक कलह विकोपाला; शाळेच्या आवारातील क्वाटरमध्ये शिक्षकाने संपविले जीवन

शिक्षक भरती घोटाळ्यात दोषींवर कारवाई नक्की 

शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीमध्ये कोण कोण आहे. याची लवकरच माहिती समोर येईल. यात कोणावरही अन्याय होणार नाही. शिक्षण विभाग म्हणून आमची ते जबाबदारी आहे. जो कोणी निरप्राध आहे; त्यांच्यावर अन्याय होणार नाही. चुकीच्या काम बिलकुल होणार नाही. परंतु चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळून आला त्याच्यावर निश्चित कारवाई होणार असल्याचे दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com