Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून खुल्या तेलाची विक्री; नागपुरातील धक्कादायक प्रकार, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Nagpur News : पोलिसांनी कारवाई केल्यानंतर कॉपी राईट एकसह ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा गोरखधंदा मागील किती वर्षांपासून सुरू होता. तसेच गोदामामध्ये किती साहित्य पडले आहे

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: अन्न पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तर काही जण बनावट माल विक्री करत असतात. असाच प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. नागपुरात लोकल तेलाच्या डब्ब्यावर ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून तेलाची विक्री सुरू असल्याचा गोरखधंदा उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर नागपुरातील क्राईम ब्रँच युनिट चार आणि हुडकेश्वर पोलिसांनी अदानी विलामार कंपनीचे अधिकऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये बनावट तेलाच्या डब्यांवर ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून मार्केटमध्ये विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे.  

७ लाखांचा मुद्देमाल जप्त 

दरम्यान पोलिसांनी निलेश दिलीप साहू यास अटक करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान खुले विकले जाणारे तेल हे डब्ब्यात भरले जात होते. त्यावर ब्रँडेड कंपनीचे लावले जाणारे स्टिकर मिळून आले. यावेळी बनावट लेबल लावलेले २८ तेलाचे डब्बे, शेकीडो कागदी लेबल्स, खाकी खर्डा, झाकण पॅकिंग मशीन, तेलाचे डब्बे भरण्यासाठी मोटार पंप, पॅकिंग पट्टी रोल, चार चाकी टाटा कंपनी असा एकूण ७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

कॉपी राईट अंतर्गत गुन्हा दाखल 
दरम्यान पोलिसांनी कारवाई केल्यानंतर कॉपी राईट एकसह ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा गोरखधंदा मागील किती वर्षांपासून सुरू होता. तसेच गोदामामध्ये किती साहित्य पडले आहे. यासह हे तेल कुठून आणलं जात होते. लोकांच्या आरोग्याशी ब्रँडेड कंपनीच्या लेबल लावून खेळ सुरू होता. कोण कोण हे विकत होतो..या सगळ्यांचा शोध पोलिस आता घेणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांच आक्रमक आंदोलन..

Dharmendra Pradhan: मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार, ओम बिर्लांची घेतली भेट

EPFO : लग्न ठरलंय! पीएफचे पैसे कसे काढायचे? EPFO चा हा नियम आत्ताच वाचा

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

SCROLL FOR NEXT