शिरपूर (धुळे) : शिरपूर तालुक्यात आजही गांजाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यातच शिरपूर तालुक्यातील आसरापाणी येथील अतिक्रमित वनजमिनीवर सुरू असलेली गांजाची शेती सांगवी पोलिसांनी उद्ध्वस्त केली. या कारवाईत ओला आणि कोरडा गांजा मिळून एकूण ५१ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
शिरपूर तालुक्यातील आसरापाणी शिवारात संशयित भियासिंह दिलदार पावरा याने अतिक्रमित वनजमिनीवर गांजाची शेती केली होती. गांजाची तोडणी करून तो विक्रीसाठी पाठविणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकला असता संशयित भियासिंहच्या शेतात ११३ किलो कोरडा गांजा आढळून आला. त्याच्या शेतात उभी गांजाची झाडे पोलिसांनी उपटून काढली. झाडांचे वजन ८०० किलो भरले.
संशयित फरार
तर आसरापाणी शिवारापासून पाच किलोमीटरवरील हाडाखेड शिवारात दशरथ रिशा पावरा (रा. हाडाखेड) याने देखील अतिक्रमित वन जमिनीत गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. तेथील कारवाईत एक हजार २०० किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमाल सांगवी पोलिस ठाण्यात नेण्यात आला. मात्र, कारवाईचा सुगावा लागल्यानंतर संशयित फरारी झाले. त्यांच्याविरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वन विभागाचे लक्ष
गांजा लागवडीची जागा पोलिसांनी कारवाईच्या आदल्या दिवशीच हेरली होती. मात्र, लवकर अंधार झाल्याने कारवाईत अडथळा येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वन विभागाकडे माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे व सहकाऱ्यांनी रात्रभर शेतावर लक्ष ठेवून होते. रात्र जागून काढत संशयिताला गांजा नेण्याची कोणतीही संधी न देता कर्मचाऱ्यांनी गस्त ठेवली. सकाळी पोलिस व वन विभागाने संयुक्त कारवाई करीत गांजा जप्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.