Nagpur News  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News: अतिक्रमण कारवाईदरम्यान एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर पेट्रोल टाकून घेतलं पेटवून; पाहा VIDEO

Nagpur Latest News: नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील बेलोणा ग्रामपंचायतकडून आज अतिक्रमण कारवाई करण्यात आली. अतिक्रमण कारवाईदरम्यान एका पीडित व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटण्याचा प्रयत्न केला.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

अतिक्रमण कारवाईदरम्यान एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील बेलोणा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. अंगावर पेट्रोल टाकून एका ग्रामस्थाने पेटवून घेतलं. इतर ग्रामस्थांनी तात्काळ आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टकला. या घटनेमध्ये ही व्यक्ती जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील बेलोणा ग्रामपंचायतकडून आज अतिक्रमण कारवाई करण्यात आली. अतिक्रमण कारवाईदरम्यान एका पीडित व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने अतिक्रमण कारवाईला विरोध म्हणून असं केलं. पण वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.

बेलोणा ग्रामपंचायतअंतर्गत भागात असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई ग्रामपंचायतकडून हाती घेण्यात आली होती. याच अतिक्रमणमध्ये अरविंद बांबल यांचे घर आहे. बुलडोझर कारवाईसाठी आला असताना अरविंद बांबल यांनी या कारवाईला विरोध केला. पण अतिक्रमण कारवाई सुरूच ठेवण्यात आली. कारवाई थांबत नसल्यामुळे अरविंद बांबल यांनी अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला.

अरविंद बांबल यांनी स्वत:ला पेटवून घेतल्यानंतर इतर ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने चादर घेऊन त्यांच्या अंगावर उडी मारली आणि आग विझवली. डोक्याला आग लागल्यामुळे अरविंद जखमी झाले आहेत. वेळीच आग विझल्याने मोठा अनर्थ टळला. अरविंद यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत आढळला मृतदेह, परभणीतील घटना

Rahul Gandhi : मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींची कोर्टात माहिती

MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

Crime: मामाच्या घरून परतताना दिव्यांग तरुणीवर सामूहिक बलात्कार, बचावासाठी पळत राहिली पण...; घटनेपूर्वीचा CCTV व्हिडीओ समोर

SCROLL FOR NEXT