नाशिक -
- आदिवासी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल
- जवळपास १२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल
- आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मुबंई नाका पोलिसात गुन्हा दाखल
- मागील ३५ दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यलयासमोरील रस्त्यावर सुरू आहे आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारीवरील शिक्षकांचं बिऱ्हाड आंदोलन
चंद्रपुरमध्ये मुसळधार पाऊस
चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीपासून सुरू झालेला पाऊस कायम
मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल
शहरातील मित्र नगर परिसरातील घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी
रस्त्यांना आले नाल्याचे स्वरूप
शिरूर महसूल विभागाने अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच धडा शिकवला.
या कारवाईत तब्बल ८ फायबर बोटी आणि ६ बोटी जप्त करून जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या.
अचानक केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक -
- नाशिकमध्ये अनेक बनावट व्होटर आयडी आले समोर
- उबाठाचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी केला पर्दाफाश..
- एकाच नावाने 3 बनावट व्होटर आयडी..
- तर एकाच व्यक्तीचे फोटो सारखे मात्र नावं वेगळे.
- एका आयडीवर नाव महिलेचे मात्र फोटो पुरुषाचा..
- असे अनेक बनावट कार्ड वितरित झाल्याचा संशय..
- हे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार..
- असे बनावट कार्ड तयार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी
- पुणे पाठोपाठ आता नागपूर जिल्ह्यातही भारतीय जनता युवा मोर्चातर्फे महाविद्यालय स्तरावर ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.
- पुण्यात काल एन. एस यू .आय विरोध केला होता या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक रद्द सुद्धा केले होते.
- भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे नागपूर ग्रामीण मध्ये सुद्धा महाविद्यालयात वाईस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
अमरावती -
अमरावतीच्या अचलपूर येथे फिनले मिल कामगारांचे गेल्या ७ दिवसांपासून शोले स्टाईल आंदोलन सुरूच
दोन कामगार चिमणीवर चढून करताहेत शोले स्टाईल आंदोलन
6 दिवस उलटून आंदोलनाची दखल न घेतल्याने आज पासून अन्नत्याग आंदोलन देखील सुरू
फिनले मिलमधील 700 कामगारच 26 महिन्यापासून वेतन थकले. 4 बोनस देखील थकले
मुंबईत आजपासून रंगणार शिवकालीन पारंपरिक खेळांचा थरार
लेझिम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह, पावनखिंड दौड, पंजा लढवणे, रस्सीखेच, कुस्ती आणि मल्लखांबचा समावेश
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची अनोखी संकल्पना
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन
क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचीही प्रमुख उपस्थिती
कुर्ला आयटीआयमध्ये १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान पारंपरिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन
पुणे -
खराडी रेव्ह पार्टी प्रकरण
प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळावा यासाठी वकिलांकडून पुणे न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला आहे
या अर्जावर आज दुपारी तीन वाजता सुनवानी होणार आहे
न्यायालय काय निर्णय देते याकडे लक्ष.
वर्धा -
- वर्ध्यात जोरदार पावसाला सुरुवात
- जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाची हजेरी
- शेतीसाठी उपयुक्त ठरतोय पाऊस
- पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
- शेती कामांना येणार वेग
नागपूर -
नागपुरात सकाळपासून रिमझिम पाऊस
- आजपासून पुढील २ दिवस विदर्भात पावसाचा येलो अलर्ट
- 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
- ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून नागपूर सह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली आहे
नागपूर
- रक्षाबंधनाचे औचित्य साधून यंदा १ कोटी ९३ लाख बहीण-भावांनी एसटी बसेसमधून केला प्रवास.
- एसटी महामंडळाला चार दिवसांत १३७.३७ कोटी रुपये प्राप्त.
- नागपूर जिल्ह्याचे उत्पन्न ४५ लाख ९५ हजार, २५९ रुपये आहे.
- यंदाच्या आर्थिक वर्षातील एसटीचे हे सर्वाधिक आहे.
- ८ ऑगस्टपासून तर ११ ऑगस्टपर्यंत सलग चार दिवस एसटीची प्रत्येक बस प्रवाशांनी खचाखच भरलेली आढळली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.