Maharashtra Rain News: राज्यभरात पावसाचा धुमाकूळ! विदर्भाला झोडपलं, नागपूर, अमरावती, भंडाऱ्यातही संततधार सुरु; पुढील २४ तास महत्वाचे

Maharashtra Rain Weather IMD Alert Updates: राज्यभरात पावसाने थैमान घातले असून भंडारा, चंद्रपूर, अमरावती, नागपूरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. अनेक जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Rain News: राज्यभरात पावसाचा धुमाकूळ! विदर्भाला झोडपलं, नागपूर, अमरावती, भंडाऱ्यातही संततधार सुरु; पुढील २४ तास महत्वाचे
Rain News in MaharashtraSaam TV
Published On

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले आहे. आज सकाळपासून विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नागपूर, भंडारा, अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सुरू असून शाळांना सुट्ट्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.

अमरावतीत मुसळधार

अमरावती जिल्ह्यातील माधान गावात काल रात्री मुसळधार पावसामुळे येथील नाल्याला पुर आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता बंद असून या पुराचं पाणी गावात शिरलं होत तर गावातील रस्त्याला नदीचे स्वरूप आलेले होते. जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यतील चांदुर बाजार मोर्शी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असून जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टोला गावात नदीला मोठा पूर आला आहे.

भंडाऱ्यातही धुमाकूळ

भंडारा जिल्ह्यात रात्री पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रीपासून आलेल्या मुसळधार पावसाचा मुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अश्यातच लाखांदूर ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर मार्गे जाणाऱ्या पिंपळगाव येथील नाल्यावरुन पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

Maharashtra Rain News: राज्यभरात पावसाचा धुमाकूळ! विदर्भाला झोडपलं, नागपूर, अमरावती, भंडाऱ्यातही संततधार सुरु; पुढील २४ तास महत्वाचे
West bengal Politics : लोकसभेत भाजपचा आकडा होणार कमी, दोन खासदार TMC मध्ये करणार प्रवेश?

सिंधुदुर्गमध्येही जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळ पासून पावसाने उसंत घेतली आहे. मात्र मागील दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तेरेखोल नदी इशारा पातळीच्या वरती वाहत आहे. तर गडनदी, कर्ली नदी, तिलारी नदी, वाघोटान या महत्वाच्या नद्यांची पातळी आता कमी झालेली आहे.

पावसाचा जोर काही भागात कमी असला तरी ढगाळ वातरणामुळे आज देखील पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra Rain News: राज्यभरात पावसाचा धुमाकूळ! विदर्भाला झोडपलं, नागपूर, अमरावती, भंडाऱ्यातही संततधार सुरु; पुढील २४ तास महत्वाचे
Shirpur Crime : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले; लाखोंची रोकड घेऊन चोरटे पसार

नागपूर शहरामध्येही सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे, सकाळापासून पाऊस सुरू असल्याने मनीष नगर कडे जाणारा अंडरपास मध्ये पाणी तुंबले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्यानं पाणी तुंबल्यानं वाहतुक बंद झाली आहे.

याचा फटका विमानसेवेला बसला असून मुंबईवरुन नागपूरला येणारी सकाळची फ्लाईट रद्द करण्यात आली आहे. विमान रद्द झाल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विरोधीपक्ष नेते यांनाही फटका बसला असून रामदास आठवले यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे.

Maharashtra Rain News: राज्यभरात पावसाचा धुमाकूळ! विदर्भाला झोडपलं, नागपूर, अमरावती, भंडाऱ्यातही संततधार सुरु; पुढील २४ तास महत्वाचे
Junnar Accident : कल्याण-नगर महामार्गावर भयानक अपघात, भरधाव कारची दुचाकीला धडक, पती-पत्नी १० फूट हवेत उडाले, थरारक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com