नागपूरमध्ये फुटपाथ खचून खड्डा पडला आहे. हा खड्डा तब्बल १२ फूट खोल असून यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात पडला आहे. नागपूरच्या पूर्व भागात पारडी परिसरात फुटपाथ खचला आहे. पावसामुळे फुटपाथ खालची माती खचली आणि म्हणून हा खड्डा पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या फुटपाथच्या खालून नऊ हजार मिलीमीटरची सिवर लाईन जाते. ट्रंक लाईन खराब झाल्याने हा खड्जा पडला असावा असे सांगितले जात आहे. नागपूर महानगर पालिकेला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडने फुटपाथ दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.