Nagpur News : धक्कादायक! सतत मोबाइल बघतो म्हणून आई-बाबा ओरडले; अकरावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य

Nagpur Umarkhed News : नागपूरच्या उमरखेड परिसरात एक धक्कादायक घटना घडली. मोबाइलच्या अतिवापरामुळे आई-वडील रागवल्याने एका अल्पवयीन मुलाने स्वत:चा गळा चिरुन आपली जीवनयात्रा संपवली.
Nagpur Umarkhed News
Nagpur Umarkhed NewsSaam TV
Published On

मोबाइलच्या अतिवापरामुळे आई-वडील रागवल्याने एका अल्पवयीन मुलाने स्वत:चा गळा चिरुन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना नागपूर शहरातील उमरखेड परिसरात शुक्रवारी (ता. १९) पहाटेच्या सुमारास घडली. हर्ष महेंद्र म्हैसकर असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो अकरावीत शिक्षण घेत होता.

Nagpur Umarkhed News
Nanded News : धक्कादायक! उमरी तालुक्यात आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह; नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच हर्ष दहावी परीक्षा पास झाला होता. त्याने तब्बल ८७ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर आई-वडिलांनी त्याला मोबाइल (Mobile) घेऊन दिला होता. मात्र, हर्ष याला काही दिवसातच मोबाइल वापराचे व्यसन जडले. दिवस-रात्र तो मोबाइलवर गेम खेळायचा. हर्षचे वडील हे ट्रकचालक आहेत.

मुलगा शिकावा उच्चशिक्षित व्हावा अशी त्यांना वाटत होतं. त्यामुळे मोबाइलचा अतिवापर करू नको, असं म्हणत वडील हर्ष याच्यावर रागावले होते. याच गोष्टीचा राग त्याने मनात धरला. शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तो आंघोळीला गेला. खूप वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने आई-वडिलांना चिंता पडली.

आवाज देऊन प्रतिसाद न मिळाल्यामुळे दरवाजा तोडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा समोर असलेली दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हर्ष हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांनी तातडीने त्याला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. मात्र, उपचाराआधीच हर्षचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, घटनेची माहिती उमरेड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेची नोंद घेतली. हर्ष हा अत्यंत हुशार आणि होतकरू विद्यार्थी होता. मात्र, मोबाइलमुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे आई-वडिलांनी चिंतेपोटी त्याला हटकले आणि हाच विषय त्याच्या जीवावर उठला. याप्रकरणी पोलिसांनी अकास्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Nagpur Umarkhed News
Buldhana News: औषध फवारणी करताना काळजी घ्या! बुलढाण्यात आणखी चार महिलांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com