MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

Maharashtra State Transport: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान तिकीट विक्रीतून मोठी कमाई केलीय. अवघ्या चार दिवसांत 137.37 कोटी रुपये कमाई केलीय.
Maharashtra State Transport Corporation
MSRTC Bus saam tv
Published On
Summary
  • एसटी महामंडळाची चार दिवसात सुसाट कमाई.

  • 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान 137.37 कोटी महसूल मिळाला.

  • प्रवासी तिकिट विक्रीतून महसूल मिळवण्यात यश.

  • महाराष्ट्र परिवहन क्षेत्रातील विक्रमी उत्पन्न.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने चार दिवसात सुसाट कमाई केलीय. गेल्या चार दिवसांमध्ये सव्वाशे कोटींहून अधिकची कमाई एसटीनं केलीय.प्रवासी तिकिटांच्या माध्यमातून एसटी महामंडळाने या चार दिवसांमध्ये 137.37 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 8 ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये एसटी महामंडळाने सुसाट कमाई केलीय.

यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीला पसंती दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. परिवहन माहमंडळाचे 15,000 बसचे जाळे असून राज्यभरातून दररोज सुमारे 60 लाख प्रवाशी प्रवास करतात. दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी) या दोन दिवसांत एसटीला विक्रमी उत्पन्न मिळत असते. यावेळी रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अनेकांनी प्रवासाचे साधन म्हणून एसटीला पसंती दिलीय.

Maharashtra State Transport Corporation
बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

त्यामुळे महामंडळाची मोठी कमाई झालीय. महामंडळाला 11 ऑगस्ट तारखेला तब्बल 39 कोटी रुपयांचे उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. एसटीच्या या कामगिरीनंतर परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिलीय. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न असल्याचं मंत्री सरनाईक म्हणालेत. एसटीला या चार दिवसांत 1 कोटी 93 लाख प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला.

यात 88 लाख इतक्या महिला प्रवासी असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 30.06 कोटी, रक्षाबंधनाच्या दिवशी 34.86 कोटी, दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 33.36 कोटी रुपये, तर सोमवारी तब्बल 39.9 कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले आहेत.

Maharashtra State Transport Corporation
Pune ST Bus : एसटी बस कंडक्टरवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रोडने मारहाणीचा प्रयत्न; पुण्यात भयंकर घडलं

एसटी महामंडळाला विठुराया पावला!

रक्षाबंधनाप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त एसटीला मोठं उत्पन्न मिळालं होतं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. 9 लाख 71 हजार भाविकांनी एसटीने प्रवास केला होता. त्यामुळे महामंडळाला 35 कोटी 87 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com