Nagpur Scam News  
महाराष्ट्र

Nagpur Injection Scam News: नागपूरमध्ये सर्वात मोठा इंजेक्शन घोटाळा उघड! खरेदी केलेले इंजेक्शन परत दुकानात; २ आरोपींना अटक

या प्रकरणी दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची एम्स प्रशासनाने हकालपट्टी करत पोलिसात तक्रार दिली.

संजय डाफ

Nagpur News: एकच इंजेक्शन एकापेक्षा अधिक लोकांना दिल्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे वेगळं सांगायची गरज नाही. अगदी HIV पर्यंतही प्रकरण जाऊ शकतं. याची कल्पना असतानाही नागपूरातल्या एम्समध्ये असाच धककादायक प्रकार समोर आला आहे. यानिमित्ताने इंजेक्शन घोटाळा समोर आला असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर हॉस्पीटल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Nagpur Injection Scam)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरच्या (Nagpur) एम्स रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला. इथे इंजेक्शन खरेदीमध्ये मोठी हेराफेरी केली जात होती. पैसे इंजेक्शनचे ग्राहकांना द्यायला लावायचे आणि पुन्हा तीच इंजेक्शन दुकानात नेऊन ठेवायचे. ग्राहकांकडून ज्यादाचे इंजेक्शन किंवा तीन इंजेक्शन खरेदी करायला सांगायचे. हा सगळा प्रकार एमआरआय करणाऱ्यांनी समोर आणला.

असा झाला पर्दाफाश..

घडलं असं की आमआरआय करण्यासाठी तीन रुग्ण गेले. त्यावेळी तिघांनाही एक एक इंजेक्शन खरेदी करायला सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीन इंजेक्शन खरेदी केली. पैसेही दिले आणि रुग्णालयात आले. त्यानंतर त्यांच्याकडून हे इंजेक्शन घेतली मात्र दोन इंजेक्शन न फोडता परत दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आले. तर एकच इंजेक्शन तीन रुग्णांना देण्यात आले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, दलालांच्या माध्यमातून हे इंजेक्शने परत खरेदी केले जायचे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची एम्स प्रशासनाने हकालपट्टी करत पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर सोनेगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र, हा प्रकार रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा असल्यानं यावर कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सोलापूर उत्तर मधून विजयकुमार देशमुख आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

SCROLL FOR NEXT