Jalna News: तळेगाव वाडी गाव स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करा; ग्रामस्‍थांच्‍या इशाऱ्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात गाव समाविष्ठ

तळेगाव वाडी गाव स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करा; ग्रामस्‍थांच्‍या इशाऱ्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात गाव समाविष्ठ
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On

जालना : जालना जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी भोकरदन तालुक्यातील तळेगाव हे फुलंब्री तालुक्यात समाविष्ठ करण्यात आले. मात्र गृप ग्रामपंयतीत समाविष्ठ असलेल्या (Jalna News) ग्रामपंचायतीत चार सदस्य असलेल्या तळेगाव वाडी हे गाव जालन्यातील भोकरदन आणि संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील फुलंब्री या दोन्ही महसूल विभागाकडून वगळण्यात आले. याबाबत वारंवार निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई होत नसल्याने हे गाव नमके कुठल्या जिल्ह्यात? असा प्रश्न गेल्या दहा वर्षापासून निर्माण झाला आहे. त्यामुळे तळेगाव वाडीतील ग्रामस्थांनी या गावाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी थेट राष्ट्रपती, राज्यपाल आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याकडे करत चक्क गाव सोडून ग्रामपंचायत तळेगाव या ठिकाणी झोपडी टाकून राहण्याचा इशारा दिला होता. (Latest Marathi News)

Jalna News
Chhatrapati Sambhajinagar News: बेशिस्त वाहन चालकांना दणका! छ. संभाजीनगर पोलिसांनी वसूल केला २ लाख ६१ हजारांचा दंड

दहा वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यात असलेल्या भोकरदन तालुक्यातील टाकली कोलते, धानोरा, रिधोरा देवी आणि तळेगाव या गावानी ग्रामपंचायतीने भोकरदन तालुक्यातून संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात गाव समाविष्ठ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तळेगाव ग्रुप ग्रामपंचायतीत (Gramapanchayat) तीन सदस्य असलेल्या तळेगाव वाडी या गावातील नागरिकांनी फुलंब्री तालुक्यात जाण्यास विरोध दर्शविला होता. तेव्हापासून तळेगाव वाडी हे गाव ना जालना जिल्ह्यात ना संभाजीनगर जिल्ह्यात अशी अवस्था या गावाची झाली होती. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या प्रशासनासमोर पेच निर्माण झाल्याने या ठिकाणी कुठलीच सुविधा देण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.

Jalna News
Talathi Bharati 2023: नोकरीची सुवर्णसंधी! राज्यात ४,६४४ तलाठी पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

जालना व छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्याच्या महसूल विभागात तळेगाव वाडी या गावचा समावेश नसल्याने व त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आरोग्य आणि शेतकऱ्याचे विविध योजनेच्या लाभांपासून वंचित राहण्याची वेळ या ग्रामस्थांवर ओढवली. यामुळे ग्रामस्थांनी तळेगाव वाडी गावाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करावे; अशी मागणी केल्याने मानव अधिकार आयोगाने याबाबत दोन्ही जिल्ह्याच्या महसूल प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. या सुचनेनंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले होत. जालना आणि संभाजीनगर महसूल प्रशासनाच्या विभागीय अधिकारी यांच्यासह तहसीलदार पंचायत समिती गटविकास अधिकारी गावांत दाखल होत. नागरिकांच्या समस्या जाणून घेत भोकरदन विभागीय अधिकारी यांनी तात्काळ ग्रामसभा घेतली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार या १४ लोकसंख्या असलेल्या या तळेगाव वाडीचा समावेश संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Jalna News
Dhule News: जात प्रमाणपत्रासाठी विद्यार्थीच बसले आंदोलनाला; आदिवासी टोकरी कोळी संघटनेचे आंदोलन

दरम्यान फुलंब्री तालुक्यात समाविष्ठ करून तात्काळ स्वतंत्र ग्रामपंचायतीची मान्यता देण्यात यावी व गावाला संपूर्णपणे सुविधा उपलब्ध करून द्याव्या. तोप्रयन्त आमच्या स्वतंत्र राष्ट्ची मागणी कायम राहील, अशी ग्रामस्थांची मागणी केली आहे. जोपर्यंत जालना आणि संभाजीनगर प्रशासन लेखी आश्वासन देत नाही. तोप्रयन्त आंदोलन सुरच ठेवणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. त्यानंतर दिवसभराच्या आंदोलनानंतर हसनाबाद पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com