Talathi Bharati 2023: नोकरीची सुवर्णसंधी! राज्यात ४,६४४ तलाठी पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

परीक्षेसाठी दोन दिवसातच तब्बल ३० हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
Maharashtra Job
Maharashtra JobSAAM TV
Published On

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Maharashtra Talathi Bharati 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील तलाठी पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. यामध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांत एकूण ४ हजार ६४४ तलाठ्यांचे पदे भरली जाणार आहे. या परीक्षेसाठी दोन दिवसातच तब्बल ३० हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अशी माहिती भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Job Vaccency News)

Maharashtra Job
Chhatrapati Sambhajinagar News: बेशिस्त वाहन चालकांना दणका! छ. संभाजीनगर पोलिसांनी वसूल केला २ लाख ६१ हजारांचा दंड

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील तलाठी भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यानुसार जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांनी तलाठी भरतीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे. तलाठी पद भरतीसाठी उमेदवारांना १७ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी चार वाजेपर्यंत ३० हजार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्यासाठी आणखी काही दिवस असल्याने येत्या काही दिवस तलाठी पदासाठी अर्ज करण्यांच्या संख्येत आणखी वाढ होऊन ही संख्या काही लाखात जाईल असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे.

Maharashtra Job
Sachin Sawant Arrested: मोठी बातमी! वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना अटक

कशी असेल परीक्षा...

दरम्यान, तलाठी पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असेल. परीक्षार्थी पदवीधर व माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय शिकलेला असला पाहिजे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com