Nagpur News  saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: धक्कादायक! पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीने मारली तिसऱ्या मजल्यावरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू

Gangappa Pujari

मंगेश मोहिते...

Nagpur News: पोलीस पाठलाग करीत असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या एका आरोपीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुर शहरात ही घटना घडली असून इम्रान शेख असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. (Latest Marathi News)

याबाबत नागपूरच्या झोन पाचचे पोलीस उपायुक्त श्रावण दत्ता यांनी दिलेल्या माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातला देवलापार मध्ये इमरान शेख नावाच्या व्यक्तीचा ग्रामीण पोलीस शोध घेत होते. गोवंश हत्या बंदी कायद्यान्वये जनावरांची तस्करी करण्याच्या प्रकरणात इम्रान शेख वरती देवलापार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याचवेळी इम्रान हा नागपूरच्या कपिल नगर परिसरातल्या म्हाडा क्वार्टर मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावरती पोलीस रविवारी म्हाडा क्वार्टर्स मध्ये पोहोचले. पण पोलीस आल्याचे दिसताच इम्रान शेख यांनी तिसऱ्या मजल्यावर उडी घेतली.

या घटनेत इम्रान गंभीर जखमी झाला होता. ज्यामुळे त्याला नागपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात इम्रान शेख यांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कारवाईमुळे इम्रान मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. इम्रानच्या नातेवाईकांच्या आरोपाची चौकशी केली जाईल असे नागपूर पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. (Nagpur News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif: कतरिनाला झाला मधुमेहाचा आजार? दंडावरील पॅचमुळे चाहत्यांमध्ये चर्चा, पाहा Video

Pune Crime : बिबेवाडीला जाण्यासाठी स्वारगेटवरून रिक्षा पकडली अन् घडला भयंकर प्रकार; पुण्यातील घटनेने खळबळ

Live Video : रतन टाटांची अंतयात्रा | Marathi News

PAK vs ENG: पाकिस्तानमध्ये इंग्लंडने तोडला भारताचा २० वर्ष जुना विक्रम, काय होता रेकॉर्ड?

Maharashtra News Live Updates: राज्याच्या गृह विभागात दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बद्दल्या

SCROLL FOR NEXT