Balasaheb Thorat: सत्यजित तांबे काँग्रेसमध्ये परतणार? बाळासाहेब थोरातांनी दिले संकेत; विखे पाटलांनाही दिला इशारा
सचिन बनसोडे
Balasaheb Thorat On Satyajeet Tambe: नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन चांगलाच वाद पाहायला मिळाला होता. यामुळे कॉंग्रेसमधील गटबाजीही चव्हाट्यावर आली होती. या सगळ्या वादानंतर आज सत्यजित तांबे यांच्याकडून संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांचे संगमनेरमध्ये जल्लोशात स्वागत करण्यात आले. उपचारानंतर पहिल्यांदाच थोरात संगमनेरमध्ये आले आहेत, यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांंनी सत्यजित तांबेंच्या वादावर महत्वाचे विधान केले आहे. (Latest Marathi News)
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी, "भारत जोडो यात्रा संपुर्ण देशभरात गेली मात्र सर्वात सुंदर नियोजन महाराष्ट्रात झाले असे म्हणत राहुल गांधी यांच्या शेगावमधील सभेचे जोरदार कौतुक केले. यामध्ये सत्यजितने खूप काम केले असे म्हणत सत्यजित तुझी टीम काँग्रेसमध्ये आणि तू एकटाच राहिलास, पण तुलाही करमायचे नाही आणि काँग्रेसलाही करमायचे नाही, त्यामुळे काहीही काळजी करू नकोस," असा सल्लाही त्यांनी (Balasaheb Thorat) यावेळी दिला.
ती तांत्रिक चुकही झाली नसती..
यावेळी पुढे बोलताना त्यांनी "सत्यजित म्हणतो तांत्रिक चुक झाली, मात्र माझा हात नीट असता तर निवडणूकित तांत्रिक चूकही झाली नसती, असे म्हणत आपला विचार हा कॉंग्रेसचा विचार असल्याचा पुनरोच्चर बाळासाहेब थोरातांनी यावेळी केला. त्याचबरोबर नगर जिह्यातील सुडाचे राजकारण जिल्हा खपवून घेणार नाही, हे जास्त काळ टिकणार नाही," असा इशाराही राधाकृष्ण विखे पाटलांना दिला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.