Kartik Aaryan Movie: कार्तिक आर्यनने सांगितले चित्रपट होण्यामागील रहस्य, म्हणतो 'मी प्रेक्षक म्हणून विचार करतो आणि...'

कार्तिककडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे तो सगळ्यांना हवाहवासा वाटतो.
Kartik Aaryan Movie Fees
Kartik Aaryan Movie FeesSaam Tv

Kartik Aaryan Interview: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला काही वर्षातच स्टारडम मिळाले. त्याचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला हॉरर-कॉमेडी भूल भुलैया 2 ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपट हिट झाल्यानंतर निर्माते आणि प्रेक्षक दोघांकडून त्याची मागणी वाढली आहे. कोरोनानंतर एकही हिंदी चित्रपट तिकीट सोनेरी कमाई करू शकला नाही. मग कार्तिककडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे तो सगळ्यांना हवाहवासा वाटतो.

कार्तिकच्या सांगतो की त्याच्या यशाचे कोणतेही ‘गुप्त सूत्र’ नाही. कार्तिकने माध्यमांशी बोलताना सांगितले की, केवळ त्याची अंतःप्रेरणा, मेहनत आणि आत्मविश्‍वास यामुळे त्याने ही कामगिरी केली आहे. त्याच्या सात चित्रपटांपैकी शेवटचे सहा चित्रपट हिट ठरले आहेत.

Kartik Aaryan Movie Fees
Siddharth-Kiara Reception: सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमधील इनसाईड व्हिडिओ; जोडप्याचा भन्नाट डान्स पाहून चाहतेच काय सेलिब्रिटीही झाले अवाक

"कधी कधी हे खोटं वाटतं पण त्यात काही गुप्त सूत्र नसतं... प्रेक्षक म्हणून मला काय बघायला आवडेल त्यानुसार मी माझ्या चित्रपटांचा विचार करतो," असे वक्तव्य अलीकडेच कार्तिकने केले होते. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या फ्रेडीसोबत कार्तिकने ओटीटीवर पाद्रपण केले.

आता कार्तिक, रोहित धवन शेहजादा या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यास उत्सुक आहे. शेहजादामध्ये क्रिती सेनॉन सुद्धा मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'अला वैकुंठपुरमुलू'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

यापूर्वी, कार्तिकने कबूल केले होते की, कोरोनामुळे इंडस्ट्री वाईट काळातून अवस्थेतून जात असताना देखील त्याने राम माधवानी यांच्या धमाकामध्ये दहा दिवसांच्या 20 कोटी रुपये घेतले. आप की अदालतच्या एका एपिसोडमध्ये त्याने फीबद्दल आणि चित्रपट निर्माते त्याला भरीव रक्कम का देतात याबद्दल सांगितले होते.

जेव्हा पत्रकार रजत शर्मा, कार्तिक आर्यनला म्हणले की तो स्वत:चा इतका चाहता झाला आहे की त्याच्या पहिल्या चित्रपटात (₹१.२५ लाख) ‘सवा लाख’ कमावल्यानंतर तो आता २० कोटी रुपये मागतो. कार्तिक यावर उत्तर देत म्हणाला, "वो तो दस दिन के हैं (ते 10 दिवस होते)." जेव्हा त्याने संपूर्ण गोष्ट स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा होस्ट पुढे म्हणाले, “नाही, तुम्ही गंमत करत आहात ना.

कोविड-19 काळात तुम्ही 10 दिवस शूट केलेल्या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये घेतले होते.” त्यानंतर कार्तिकने सांगितलेत, “सर मी हे कोरोना काळात केले होते, पण मी माझ्या फीसची या चर्चा शोमध्ये करू शकतो, मला नाही माहीत.

पण हा धमाका चित्रपटाचे १० दिवस शूट केलं होतं, ते माझं मानधन होत. माझे कष्ट आहेत ते आणि मी दहा दिवसाचे पैसे वीस दिवसात निर्मत्याला डबल करून देतो. म्हणून मला वाटते की मला जे पैसे दिले जातात त्याला मी पात्र आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com