Siddharth-Kiara Reception: सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमधील इनसाईड व्हिडिओ; जोडप्याचा भन्नाट डान्स पाहून चाहतेच काय सेलिब्रिटीही झाले अवाक

सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमधील फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
Siddharth-Kiara Reception
Siddharth-Kiara ReceptionSaam TV

Inside Video Of Siddharth-Kiara Reception: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी रविवारी मुंबईत त्यांच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन आयोजित केला होते. हा एक तारे तारकांनी सजलेला कार्यक्रम होता. या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी बॉलीवूडमधील सर्व दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते.

सिद्धार्थची एक्स-गर्लफ्रेंड आणि सहकलाकार आलिया भट्ट देखील ब्रह्मास्त्र चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. सिद्धार्थ आणि कियारा यांनी ७ फेब्रुवारीला राजस्थानमधील सूर्यगड पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली. मुंबईत त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी, जोडप्याने सेंट रेगिस या हॉटेलची निवड केली होती. या हॉटेलच्या नवव्या मजल्यावर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

Siddharth-Kiara Reception
Siddharth-Kiara Reception: सिद्धार्थ- कियाराच्या ग्रँड रिसेप्शनमध्ये बॉलिवूडची मांदियाळी, सेलेब्रिटींचा दिसला ग्लॅमरस अवतार

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सर्व बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. वधू-वर सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या लुकसाठी इंडो-वेस्टर्नचे कॉम्बिनेशन निवडले होते. कियाराने एक लहान ट्रेल असलेला सुंदर मोनोक्रोम इव्हनिंग गाउन घातलेला दिसला तर सिद्धार्थने ब्लिंगी ब्लॅक सूट परिधान केला होता. कियाराचे दागिन्यांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधले.

पार्टीतील फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओ सिद्धार्थ आणि कियारा काला चष्मा गाण्यावर नाचताना दिसत आहेत. त्यांच्या डान्स अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओमध्ये, सिद्धार्थ आणि इतर पाहुणे त्याच्या बार बार देखो चित्रपटातील गाण्याचे सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहेत. तसेच दोघांनाही 'बुर्ज खलिफा' या गाण्यावर देखील ठेका धरला आहे.

पार्टीतील फोटोंमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर, करण जोहर, मनीष मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यासारख्या पाहुण्यांसोबत पोज देताना दिसत आहेत. तसेच सिड-कियाराने त्यांच्या कुटुंबियांसोबत देखील दिसत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी, ज्यांनी 2021 मध्ये प्राइम व्हिडिओवर 'शेरशाह'मध्ये एकत्र काम केले होते. सिड-कियाराचे लग्न त्यांच्या जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसवर अगदी शाही पद्धतीने पार पडले. त्यानंतर दोघेही दिल्लीला गेले. तिथे नातेवाईकांसाठी रिसेप्शन ठेवण्यात आले होते. काल मुंबईत बॉलिवूडसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com