UPSC Exam  Saam tv
महाराष्ट्र

UPSC Exam: यूपीएससी परीक्षा क्रॅक केली तरीही नोकरी नाही, ९८५ ओबीसी उमेदवारांचं भवितव्य अंधारात

Job Crisis for UPSC Cleared OBC Candidates: यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करूनही देशातील ९८५ ओबीसी उमेदवार नोकरीपासून वंचित आहेत. मागील आठ वर्षांपासून ९८५ ओबीसी उमेदवार ज्यांनी यूपीएससी परीक्षा पास केलेली आहे.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

यूपीएससी परीक्षा क्रॅक करून अधिकारी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. यासाठी ते बरीच वर्षे मेहनत करतात. पण अनेक यूपीएससी परीक्षा पास झालेले उमेदवार असे आहेत जे अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. देशभरातील तब्बल ९८५ ओबीसी उमेदवार यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची अद्याप नियुक्ती झाली नाही त्यामुळे त्यांचे भवितव्य अंधारात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करूनही देशातील ९८५ ओबीसी उमेदवार नोकरीपासून वंचित आहेत. मागील आठ वर्षांपासून ९८५ ओबीसी उमेदवार ज्यांनी यूपीएससी परीक्षा पास केलेली आहे. त्यांना केंद्र सरकारने कोणत्याही सेवेत रुजू करून घेतलेले नाही. यामध्ये राज्यातील १५० विद्यार्थी आहेत. आपापल्या राज्यात नॉन क्रिमिलियर या गटात मोडतात. मात्र केंद्र सरकारने त्यांना नॉन क्रिमिलियरचा लाभ दिलेला नाही.

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्याया विद्यार्थ्यांचे पालक अनुदानित शाळेतील शिक्षक, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, भारत सरकारचे उपक्रम जसे डब्लूसीएल, एनटीपीसी, गेल, सेल , सर्व PSU आणि राज्य सरकारचे उपक्रम एम एस ई बी स्टेट ट्रान्सपोर्ट विभाग आणि भारतभरातील सर्व बँका महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमधे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ओबीसी आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप ओबीसी युवा अधिकार मंचाकडून केला जात आहे.

आपापल्या राज्यात नॉन क्रिमिलेअर गटात येणाऱ्या या उमेदवारांना केंद्र सरकारने मात्र त्यांना नॉन क्रिमिलेअरचा लाभ दिलेला नाही. २०१७ पासून सुप्रीम कोर्टामध्ये याला आव्हान देण्यात आले आहे. मात्र त्याची अजूनपर्यंत सुनावणी झाली नाही. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगलाही याबाबत विनंती करण्यात आली आहे. आता या उमेदवारांची नियुक्ती केंद्र सरकारकडून कधी करण्यात येईल हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

Accident News : घंटागाडीची दुचाकीला धडक, गाडीचा जागीच चक्काचूर

Sanjay Gaikwad: डिफेंडरवरुन महायुतीत नवा बवंडर? संजय गायकवाडांना कुणी घेरलंय?

मुलगी पाहण्यासाठी जाताना काळाचा घाला, इंजिनिअर तरूणासह दोघांचा अपघातात मृत्यू

SCROLL FOR NEXT