नागपूरमध्ये नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठीच ठेवण्याचा विहिंपचा निर्णय.
मुस्लीम तरुण गरब्यात आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचा इशारा.
आधारकार्ड तपासणी करून व टिळा लावूनच प्रवेश देण्यात येणार.
या निर्णयामुळे उपराजधानी नागपूरमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता.
पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी
Navratri Utsav Garba Latest News : नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूसाठी, मुस्लीमांना प्रवेश देऊ नका, विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजकांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आधारकार्ड पाहूनच गरब्यात प्रवेश द्यावा, मुस्लिम तरूण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असेही यामध्ये म्हटले आहे. विहिंप अन् बजरंग दलाचे कार्यकर्ते यावर लक्ष ठेवून असणार आहेत. विहिंपच्या या निर्णयानंतर उपराजधानीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
नवरात्रोत्सवाला अवघ्या काही तासांवर आला आहे. २२ तारखेपासून उत्सवाला सुरूवात होणार आहे. देवीच्या नऊ रूपांची नवरात्रीत पूजा केली जाते. हिंदू धर्मातील हा मोठा सण उत्सव आहे, ९ दिवस आनंदात अन् उत्सवात गरबा खेळला जातो. पण पण नागपूरमध्ये याला वादाची किनार लागण्याची शक्यता आहे. “नवरत्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूसाठी, मुस्लीमांना प्रवेश देऊ नका” अशी भूमिका पत्रकार परिषदेत विहिंपकडून मांडली जाणार आहे.
गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघून प्रवेश करावा, टिळा लावा, देवीची पुजा करायला लावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या गरबा आयोजकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुस्लीम तरुण गरब्यात आल्यास त्यांना पोलीसांच्या ताब्यात देऊ, अशी भूमिका विहिंपकडून घेण्यात आली आहे. बजरंग दल आणि विहिपचे कार्यकर्ते असणार यावर लक्ष ठेवून असतील.
गरबा भगवतीला प्रसन्न करण्यासाठी आराधना आहे. ज्यांची श्रद्धा नाही त्यांना गरब्यात प्रवेश देऊ नये. सर्व गरबा आयोजकांना विश्व हिंदू परिषदेने निवेदन दिले आहे. गरबा नृत्य नाही, देवीला प्रसन्न करण्यासाठी गरबा खेळतो, असेही त्यामध्ये म्हटले आहे. नागपूरशिवाय मध्यप्रदेशमधील काही भागातही अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरबा कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची अश्लील किंवा असभ्य गाणी वाजवू नयेत. सर्वांनी गरबा कार्यक्रमात हिंदू संस्कृतीनुसारच वेशभूषा परिधान करून सहभागी व्हावे. आधार कार्ड तपासणी करून आणि टिळा लावूनच प्रवेश गरबासाठी प्रवेश देण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.