Nagpur Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Accident: 'ती' भेट अखेरची ठरली! मित्रांसोबत पार्टी, घराकडे जाताना काळाचा घाला; अपघातात IIM च्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Nagpur Accident: नागपुरमध्ये अपघाताची भयंकर घटना घडली. या अपघातामध्ये आयआयएमच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा विद्यार्थी मूळचा उत्तराखंडचा होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला.

Priya More

Summary -

  • नागपूरमध्ये हिट अँड रनची घटना घडली

  • आयआयएम नागपूरचा विद्यार्थ्याचा अपघातामध्ये मृत्यू

  • अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

  • मित्रांसोबत पार्टी करून घरी परतताना मिहान उड्डाणपुलावर अपघात झाला

नागपुरमध्ये 'हिट अँड रन' ची घटना घडली. अज्ञात वाहनांच्या धडकेमध्ये आयआयएमच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मित्रांसोबत ढाब्यावर पार्टी केली. त्यानंतर घराकडे परत जात असताना भयंकर अपघात झाला. या अपघातामध्ये अनुज त्रिलोचन पाठक (२२ वर्षे) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, अनुज पाठक या तरुणाचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला. अनुज उत्तराखंडाचा होता आणि तो नागपुरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एमबीएच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. तो नागपुरमध्येच मित्रांसोबत राहत होता. शनिवारी रात्री अनुज आणि त्याचे मित्र ढाब्यावर पार्टी करण्यासाठी गेले होते. वर्धा मार्गावरील 'जस्सी दा ढाबा'मध्ये त्यांनी पार्टी केली. पार्टी झाल्यानंतर अनुज आपल्या बुलेटवरून आपल्या मित्रांना घरी सोडणार होता. आधी त्याने दोन मित्रांना घरी सोडले. त्यानंतर आणखी काही मित्रांना घेण्यासाठी तो निघाला होता. पण वाटेमध्ये भयंकर घडलं.

नागपुरमधील मिहान उड्डाणपुलावरून जाताना समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्याच्या बुलेटला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये अनुज गंभीर जखमी झाला. अधिक रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अनुज बराच वेळ झाला न आल्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला फोन लावला. पण अनुजने फोन न उचलल्यामुळे त्याचे मित्र पायीच घराच्या दिशेने निघाले. यावेळी त्यांना वाटेत पुलावर अनुज मृतावस्थेत दिसून आला. त्यानंतर घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनुजचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या अपघातामध्ये अनुजच्या बुलेटचा चक्काचूर झाला. नागपूरच्या सोनगाव पोलिसांनी या अपघाताप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या अपघाताची माहिती अनुजच्या कुटुंबीयांना दिली तर त्यांना मोठा धक्का बसला. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pancreatic Cancer Symptoms: पॅन्क्रियाटिक कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखा अन् तुमचा जीव वाचवा

स्मृती मानधनाला पलाश धोका देतोय? लग्न पुढे ढकलण्याचे कारण काय? फ्लर्टी चॅट्स व्हायरल

Famous Director : प्रसिद्ध डायरेक्टरची मोठी गुंतवणूक; पॉश एरियात ५ प्रापर्टी केल्या खरेदी, किती कोटींमध्ये झाली डील?

Maharashtra Live News Update : अयोध्येत ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात

PF चे पैसे ATM मधून काढता येणार; कधीपासून सुरु होणार EPFO 3.0? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT