Accident : संभाजीनगरात भयंकर अपघात, बापाच्या डोळ्यासमोर दोन्ही लेकरांचा मृत्यू, मुलीला पाहून धाय मोकलून रडले

Gangapur accident news : छत्रपती संभाजीनगरातील बाबरगाव फाटा येथे ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत पाच वर्षांचा मुलगा आणि अडीच वर्षांची मुलगी जागीच ठार झाली, तर वडील गंभीर जखमी झाले. बापाच्या डोळ्यासमोर दोन लेकरांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
Accident News
Accident NewsSaam tv
Published On
Summary
  • ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू झाला.

  • वडील प्रदीप जाधव गंभीर जखमी असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

  • अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

  • या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून साक्षीदारांचे मन सुन्न करणारे दृश्य पाहायला मिळाले.

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी

Sambhajinagar Gangapur accident : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भयंकर अपघाताची घटना घडली आहे. ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने चिमुकल्या बहीण-भावाचा जागेवरच मृत्यू झाला. तर बाप गंभीर जखमी झाला आहे. गंगापूर जवळच्या बाबरगाव हा भयंकर अपघात झाला. बापाच्या डोळ्यासमोरच दोन्ही लेकराचा मृत्यू झाला. मुलाचे मृतदेह पाहून बाप धाय मोकलून रडत होता. हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. (Sambhajinagar Babargaon truck–bike accident full details)

५ वर्षाचा विराट प्रदीप जाधव आणि अडीच वर्षाची खुशी प्रदीप जाधव अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. शेकटा येथील प्रदीप जाधव हे वैजापूर तालुक्यातील महागाव येथे रविवारी लग्नकार्यासाठी गेले होते. लग्न आटोपन ते आपल्या दोन लेकरांना मोटार सायकलवरून गंगापूर मार्गे शेकटा येथे जात होते. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बाबरगाव फाटा येथील जिनिंगसमोर छत्रपती संभाजीनगरकडून गंगापूरकडे येणाऱ्या ट्रकने जाधव यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात दोन लेकरांचा मृत्यू झाला. वडील गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर संभाजीनगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Accident News
Local Body Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, आज फैसला होणार?

अपघातानंतर महामार्गावर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले. मुलांचे मृतदेह पाहून बापाच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता. बापाची अवस्था जिवंत मेल्यासारखी झाली होती. हे दृश्य पाहून मदतीसाठी आलेल्या प्रत्येकाचे काळीज चिरले होते. स्थानिकांनी तात्काळ अपघाताची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला. दोन्ही चिमुकल्याचे मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवले आहेत.

Accident News
Maharashtra politics : चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

बाबरगाव फाटा ट्रकने दुचाकीला धडक दिली. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. लोकांचा रोष पाहाता ट्रक चालकाने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ रूग्णवाहिकेतून जखमी प्रदीप यांना रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भीषण अपघातानंतर ट्रक चालकाने वाहन जागेवर सोडून पळ काढला. या घटनेची गंगापूर पोलिसात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

Accident News
Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com