

चार भाविकांचा मृत्यू
कारमध्ये ४ जण होते आणि सर्वांचा जागीच मृत्यू झाला.
शबरीमला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अपघात
शबरीमला मंदिरात जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. यात्रेकरुंच्या कारचा अपघात झाला असून यात ४ जणांचा मृत्यू झालाय. कार उड्डाणपुलावरील बॅरियरला धडकत एका अंडरपासमध्ये कोसळली. हा भीषण अपघात कोलार जिल्ह्यातील मालूर तालुक्यातील अबेनहल्ली गावात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार भरधाव जात होती.त्यामुळे हा अपघात घडला. भरधाव असणाऱ्या कार उड्डाणपुलाच्या बाजूच्या बॅरियरला धडकली आणि एका अंडरपासमध्ये कोसळली.
मिळालेल्या माहितीनुसार, मालूर तालुक्यातील अबेनहल्ली गावात पहाटे २.१५ ते २.३० च्या दरम्यान हा अपघात झाला. कारमधील सर्वजण केरळमधील सबरीमाला मंदिरात दर्शनासाठी जात होते. प्राथमिक तपासानुसार एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चालक वेगाने कार चालवत होता, त्याचवेळी वाहन अनियंत्रित झालं आणि कार उड्डाणपुलाच्या बाजुला असलेल्या बॅरियरवर धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कार जवळजवळ १०० मीटर अंतरावर अंडरपासमध्ये कोसळली. अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.
रविवारी मुंबई-नाशिक महामार्गावरही कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात देखील वाहनाच्या अतिवेगामुळे झाला होता. मुंबई-नाशिक महामार्गावरुन भरधाव जाणाऱ्या वॅगनार कार अनियंत्रित झाल्यानं हा अपघात झाला. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनेनंतर शहापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा अधिकचा तपास शहापूर पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात मयुरेश विनोद चौधरी वय २९ रा. तानसा 2) जयेश किसन शेंडे वय २५ रा. उंबरखाड यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.