Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू; २३ गंभीर

Uttarakhand Accident: उत्तराखंडमध्ये भाविकांची बस दरीत कोसळली. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण गंभीर जखमी झाले. हे सर्वजण गुजरातचे होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू; २३ गंभीर
Uttarakhand AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • उत्तराखंडमध्ये भाविकांच्या बसला अपघात

  • भाविकांची बस दरीत कोसळली

  • अपघातामध्ये ५ भाविकांचा मृत्यूत तर २३ जण जखमी

  • गुजरातमधील २८ भाविक दर्शनासाठी आले होते

उत्तराखंडमध्ये सोमवारी भयंकर अपघाताची घटना घडली. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीतमध्ये कोसळली. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण गंभीर जखमी झाले. एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाने बचावकार्य करत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. बसमधील सर्वजण गुजरातमधील होते. ते उत्तराखंडमधील कुंजापुरी येथे दर्शनासाठी जात होते त्यावेळी ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, टिहरी जिल्ह्यातील नरेंद्रनगर कुंजापुरी मंदिरामध्ये दर्शनासाठी काही भाविक जात होते. बसमध्ये २८ प्रवासी होते. गुजरातवरून हे सर्वजण कुंजापुरी मंदिरात दर्शनासाठी आले होते. कुंजापुरी -हिंडोलाखाल मार्गावर बस ७० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या पाच जणांनी जागीच प्राण सोडले.

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू; २३ गंभीर
Accident News : संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ब्रिजवर अचानक ब्रेक मारला, ३-४ वाहने धडकली, ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

स्थानिक नागरिकांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी एसडीआरएफच्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. मृतांमध्ये ४ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर जखमींना देखील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू; २३ गंभीर
Accident : क्षणात होत्याचं नव्हतं, प्रवाशांनी भरलेल्या दोन बसची समोरासमोर धडक; ६ प्रवाशांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com