Nagpur Hit And Run Case  
महाराष्ट्र

Nagpur Hit And Run Case Update: सूनच निघाली सासऱ्याची मारेकरी, नागपूर हिट अँड रन प्रकरणाचा धक्कादायक उलगडा

Nagpur Hit And Run Case : नागपुरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील एक धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आलीय. सासऱ्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी सूनेनेच हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर आलाय. कोट्यवधी रुपये लाटण्यासाठी ए वन क्लासची शासकीय नोकरी करणाऱ्या सूनेने सासऱ्याला मारण्यासाठी तब्बल तीन वेळा प्रयत्न केले.

Bharat Jadhav

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूर: पैशांच्या लालसेपोटी माणूस एकमेकांचा जीव घेण्यास मागेपुढे सुद्धा पाहत नाही. मग तो बाप असो किंवा आई, कोणीही पैशापुढे नात्याची कदर करत नाही. एकदा का पैशाची लालसा लागली मग व्यक्ती पैसा कमावण्याचा मार्ग कोणताही याचाही विचार करत नाही. अशीच घटना नागपूरमध्ये घडलीय. येथील बालाजी नगरमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात हा मोठा धक्कादायक खुलासा झालाय.

पती डॉक्टर,स्वत: क्लास वन शासकीय अधिकारी तरीही पैशाच्या लालसेत आंधळ्या झालेल्या महिलेने आपल्या सासऱ्याची हत्या घडवून आणलीय. सासऱ्याच्या नावावर असेल्या २२ कोटी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी सूनेने पतीच्या कार चालकाला १ कोटी रुपयांची सुपारी दिली होती. अपघाताचा तपास करताना पोलिसांनी हत्येचा उलगडा केलाय. आरोपी महिला टाऊन प्लॅनिंग विभागात गडचिरोली येथे क्लास वन अधिकारी म्हणून कार्यरत होती.

काय आहे प्रकरण

मागील माहिन्यात मे २२ तारखेला नागपुरातील बालाजी नगर परिसरात एक हिट अँड रनची घटना घडली होती. यात पुरुषोत्तम पुट्टेवार वय ८२ यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एका महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आलीय. पोलिसांच्या अटकेत असलेली महिला ही मृत व्यक्तीची सून आहे. आरोपी महिलेचं नाव, अर्चना पुट्टेवार असं आहे. अर्चना पुट्टेवार यांचा सासऱ्याची २२ कोटी रुपयांवर डोळा होता. सासऱ्याची संपत्ती लुटण्यासाठी सूनेने अपघाताची बनाव करत पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या घडवून आणली होती.

हत्येचा तीनदा प्रयत्न

अर्चना पुट्टेवार यांनी सासऱ्यांची हत्या करण्याचा तीनवेळा प्रयत्न केला. दोन प्रयत्नात पुट्टेवार यांचा जीव वाचला होता. पण तिसऱ्या प्रयत्नात पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मारेकरी गुन्हा करण्यात यशस्वी झाले. मे महिन्यात तीन प्रयत्न झाले होते. पहिला प्रयत्न हा ८ मे रोजी झाला होता. त्यानंतर दुसरा प्रयत्न १६ मे रोजी झाला. तिसरा प्रयत्न हा २२ मे रोजी झाला. पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्यासाठी अर्चना पुट्टेवार यांनी हत्येसाठी कार विकत घेतली होती.

असा झाला उलगडा

मागील माहिन्यात मे २२ तारखेला नागपुरातील बालाजी नगर परिसरात एक हिट अँड रनची घटनेत पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणी पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मुलगा डॉ. मनीष पुट्टेवार आणि त्यांची पत्नी अर्चना पुट्टेवार यांनी अजनी पोलिसात तक्रार नोंदवली. अपघात करून फरार झालेला कार चालकाला लवकर शोधावे, अशी विनंती दोघांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

या पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांनी एक सेकंड हॅण्ड कार खरेदी केल्याची माहितीही समोर आलीय. पोलिसांनी अर्चना पुट्टेकरासोबत अजून तीन जणांना अटक केलीय. या आरोपींची नावे सार्थक बागळे याने नीरज निमजे आणि सचिन धार्मिक अशी आहेत. या तिघांनी अपघाताचा कट रचवण्यासाठी कार विकत घेतली होती. यात नीरजला अपघात प्रकरणात अजनी पोलिसांनी अटक केली आणि जामिनावर सुटला होता. त्यानंतर तो बारमध्ये पैसे उडवत असल्यानं पोलिसांना संशय आला. त्यानंतर त्यांचा अधिक तपास केला तेव्हा सून अर्चना हिचे नाव समोर आले. यात अर्चना हिचा भावाला सुद्धा कटात सहभागी असल्याने त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलीस आयुक्त रवींद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोली पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. सकाळी १० वाजताच सुमारास हा अपघात झाला होता. तपास सुरू असताना अपघात नसून हत्या असल्याचं समोर आलेत. मृतक पुरुषोत्तम यांच्यावर दोन वेळा यापुर्वी हत्येचा प्रयत्न झाला. यात सून अर्चना पुट्टेवार यांच्यासह दोन जण अटकेत आहे, तर दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. क्राईमब्रँच चार ने यात सखोल तपास केला. 17 लाख रोख, गोल्ड, चार कार जप्त केल्या आहे. कार car I20, मोपेड सह दोन कारही जप्त करण्यात आले आहे. वयोवृद्धाचा संपत्तीच्या वादातून खून झाल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलीय. यात संपत्तीमध्ये ऊंटखाना येथे प्लॉट आहे, शॉप्स आहे, २० ते २२ कोटीची प्रॉपर्टी समोर येत आहे, असा पोलिसांचा दावा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT