Manasvi Choudhary
लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. महिलांना रोजच्या वापरासाठी हलक्या वजनाचे आणि दिसायला सुंदर मंगळसूत्र निवडतात.
तुम्ही देखील लेटेस्ट स्टाईलचे हलके मंगळसूत्र निवडत असतील तर, ३ ग्रॅममध्ये सुंदर मंगळसूत्र निवडा.
३ ग्रॅम सोन्यामध्ये सोन्याची चैन आणि त्यात काळे मणी आणि हिऱ्यांची डिझाईन करा.
त्रिकोण, वर्तुळ किंवा चौकोनी आकाराचे डिझाईन असतात. जे डेलीवेअरसाठी तुम्ही निवडू शकता.
काळ्या मण्यांच्या साध्या पदरात सोन्याचे पानाचे कॉइन मंगळसूत्र निवडू शकता. जे दिसायला अतिशय ट्रेडिशनल पण मॉडर्न लूक देते.
दोन सोन्याची वर्तुळे एकमेकात गुंफलेली डिझाईन ३ ग्रॅम वजनामध्ये अत्यंत सुंदर दिसते.